मुंबईच्या घाटकोपरमध्ये भीषण अपघात..! कारनं ८ जणांना उडवलं; पाहा VIDEO

WhatsApp Group

Mumbai Ghatkopar Accident : मुंबईतील घाटकोपर परिसरात बुधवारी दुपारी मोठा अपघात झाला. एका कारने धडक दिल्याने ८ जण जखमी झाले. ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी कार चालकाला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दुपारी एक वाजता घडली. कार अपघातानंतर कारचा व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये घाटकोपरच्या गजबजलेल्या परिसरात एक पांढऱ्या रंगाची कार आधी समोरून येणाऱ्या लोकांवर गेल्याचे दिसत आहे. यानंतर तेथे आरडाओरडा झाला.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नेमकी कशी घटना घडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. चालकाचं नियंत्रण सुटलं की गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाला किंवा तो नशेत होता की आणखी काही वेगळं कारण आहे याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी पोलिसांनी चालकाची चौकशी सुरु केली आहे.

हेही वाचा – मुंबई बंदरातील कंटेनरमधून १७२५ ​​कोटींची हेरॉईन जप्त..! दिल्ली पोलिसांची ‘मोठी’ कारवाई

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment