महाराष्ट्रात एका चहाच्या दुकानात एबी डिव्हिलियर्स..! फोटो झाला व्हायरल

WhatsApp Group

AB De Villiers Enjoying Tea : लोकांनी पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिका आणि आरसीबीचा महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. एबी डिव्हिलियर्सचे जगभरात अनेक चाहते आहेत, तर भारतात सर्वाधिक चाहते आहेत. डिव्हिलियर्स देखील भारताला दक्षिण आफ्रिकेनंतर आपले दुसरे घर मानतो, म्हणूनच तो मुंबईच्या रस्त्यांवर इतक्या सहजतेने फिरताना दिसत होता. होय, डिव्हिलियर्सचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो चहाच्या स्टॉलच्या बाहेर एका सामान्य माणसाप्रमाणे बसून चहाचा आस्वाद घेताना दिसत होता.

एबी डिव्हिलियर्स सध्या भारतात आहे आणि आयपीएल २०२३ चा लिलावही डिसेंबरपासून होणार आहे. मात्र, त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तरीही, तो त्याच्या माजी आयपीएल संघ आरसीबीशी संबंधित आहे. सध्या तो अनेक फोटो शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वी तो सचिन तेंडुलकरसोबतच्या फोटोंमध्ये दिसला होता. यादरम्यान सचिन आणि डिव्हिलियर्स एका हॉटेलमध्ये बसलेले दिसले.

हेही वाचा – IND Vs ENG Semifinal : दोन्ही संघांच्या Playing 11 मध्ये बदल..! ‘अशी’ असू शकते टीम इंडिया

त्याचबरोबर त्याने बॉलिवूडचा बाजीराव म्हणजेच रणवीर सिंगसोबतही वेळ घालवला. रणवीर सिंगने त्याच्या इंस्टाग्रामवर त्याचे फोटो शेअर करून चाहत्यांना या भेटीची माहिती दिली.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment