BH Number Plate : जाणून घ्या BH सीरीज नंबर प्लेटबाबत सर्वकाही! फायदे, अटी आणि…

WhatsApp Group

मुंबई : भारताच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं २८ ऑगस्ट २०२१ रोजी BH सीरीज नंबर प्लेट लाँच केली. २८ ऑगस्ट २०२२ ला लॉन्च होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे, परंतु बहुतेक लोकांना या नंबरबद्दल फारशी माहिती नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी भारत सीरीज (BH) नंबर प्लेटशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर घेऊन आलो आहोत. BH सीरीज नंबर प्लेटचे काय फायदे आहेत? तुम्ही ते तुमच्या वाहनातही बसवू शकता का? याची फी किती असेल? मी यासाठी अर्ज कसा करू शकतो? याची उत्तरं आपण जाणून घेऊ..

BH सीरीज नंबर प्लेटचे फायदे काय आहेत?

BH सीरीज नंबर प्लेट संपूर्ण भारतात वैध आहेत. अशा लोकांसाठी हे खूप फायदेशीर आहे, जे नोकरी करतात आणि ज्यांची बदली एका राज्यातून दुसऱ्या राज्यात होत असते. यामुळे, वाहनाची नोंदणी पुन्हा-पुन्हा हस्तांतरित करण्याची गरज नाही. यामुळे लोकांचा वारंवार नोंदणी हस्तांतरणाचा खर्च आणि वेळ वाचतो.

BH नंबर प्लेट लावण्यासाठी फी किती आहे?

BH सीरीज नंबर प्लेट तीन वेगवेगळ्या श्रेणींमध्ये विभागल्या आहेत. यामध्ये १० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या वाहनांना BH सीरीज नंबर प्लेट घेण्यासाठी वाहनाच्या किमतीच्या ८ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर, १० लाख ते २० लाख रुपये किंमतीच्या वाहनासाठी १० टक्के शुल्क भरावे लागेल. जर वाहनाची किंमत २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर BH सीरीज नंबर प्लेट मिळवण्यासाठी वाहनाच्या किमतीच्या १२ टक्के रक्कम मालकाला भरावी लागेल.

वाहनात BH नंबर प्लेट कोण लावू शकतं?

BH सीरीज नंबर प्लेट ते लोक लावू शकतात, ज्यांचं काम संरक्षणात आहे, म्हणजे कोणत्याही आर्मी किंवा पॅरामिलिटरी फोर्समध्ये. याशिवाय केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही ही नंबर प्लेट लावता येणार आहे. त्याच वेळी, खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे लोक देखील ही नंबर प्लेट लावू शकतात, परंतु यासाठी त्यांनी अशा कंपनीत काम करणं आवश्यक आहे ज्याचे कार्यालय चारपेक्षा जास्त राज्यांमध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहे.

BH सीरीज क्रमांकासाठी अर्ज कसा करावा?

BH सीरीज नंबर प्लेट बसवण्‍यासाठी, प्रथम तुम्‍हाला तुमच्‍या कागदपत्रांची वाहतूक अधिकाऱ्याकडून पडताळणी करावी लागेल. त्यानंतर वाहन मालकाला MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. वाहन खरेदी करताना ऑटोमोबाईल डीलर्सच्या मदतीनंही हे लॉगिन करता येतं. डीलरला मालकाच्या वतीनं पोर्टलवर फॉर्म २० भरावा लागेल. खासगी क्षेत्रातील कर्मचार्‍यांना फॉर्म ६० भरावा लागेल आणि कर्मचारी ओळखपत्र आणि कार्य प्रमाणपत्र सादर करावं लागेल.

Leave a comment