

मुंबई : ऑगस्ट महिन्याला सणांचा महिना म्हटलं, तर वावगं ठरणार नाही. ऑगस्टमध्ये रक्षाबंधन (रक्षाबंधन २०२२), जन्माष्टमी (जन्माष्टमी २०२२), गणेश चतुर्थी आणि पारसी नववर्ष तसेच स्वातंत्र्य दिन २०२२ असे मोठे सण आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) ऑगस्ट महिन्याच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. पुढील महिन्यात शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांसह १७ दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. ऑगस्टमध्ये बँकेशी संबंधित काही काम असेल तर सुट्ट्यांची माहिती जरूर घ्या. ज्या दिवशी तुम्ही बँकेत जाल, त्या दिवशी बँक बंद असेल आणि तुम्हाला असंच घरी परतावं लागेल.
राज्यनिहाय सुट्ट्या
महत्त्वाचं म्हणजे या सर्व सुट्ट्या सर्व राज्यांमध्ये लागू होणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, बँकिंग सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण किंवा त्या राज्यांमधील विशेष प्रसंगी नोटिफिकेशनवर देखील अवलंबून असतात. त्यामुळं संपूर्ण देशात ऑगस्ट महिन्यात १७ बँका काम करणार नाहीत, असं नाही.
सुट्ट्यांची यादी
- १ ऑगस्ट २०२२ – द्रुपका शे-जी उत्सव (गंगटोकमध्ये बँका बंद राहतील)
- ७ ऑगस्ट २०२२ – पहिला रविवार
- ८ ऑगस्ट २०२२ – मोहरम (जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँकांना सुट्टी असेल)
- ९ ऑगस्ट २०२२ – चंदीगड, गुवाहाटी, इंफाळ, डेहराडून, शिमला, तिरुवनंतपुरम, भुवनेश्वर, जम्मू, पणजी, शिलाँग वगळता देशभरात बँका बंद राहतील.
- ११ ऑगस्ट २०२२ – रक्षाबंधन (अहमदाबाद, भोपाळ, डेहराडून, जयपूर शिमल्यात सुट्टी असेल)
- १२ ऑगस्ट (कानपूर लखनऊमध्ये बँका काम करणार नाहीत)
- १३ ऑगस्ट २०२२ – दुसरा शनिवार
- १४ ऑगस्ट २०२२ – रविवार
- १५ ऑगस्ट २०२२ – स्वातंत्र्य दिन
- १६ ऑगस्ट २०२२ – पारशी नववर्ष (मुंबई आणि नागपूरमध्ये बँकांना सुट्टी)
- १८ ऑगस्ट २०२२ – जन्माष्टमी (भुवनेश्वर, कानपूर, डेहराडून, लखनऊ येथे बँकांना सुट्टी असेल)
- १९ ऑगस्ट २०२२ – (अहमदाबाद, भोपाळ, चंदीगड, चेन्नई गंगटोक, जयपूर जम्मू, पाटणा रायपूर रांची, शिलाँग, शिमला आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील)
- २० ऑगस्ट २०२२ – हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.
- २१ ऑगस्ट २०२२ – रविवार.
- २८ ऑगस्ट २०२२ – रविवार.
- २९ ऑगस्ट २०२२ – गुवाहाटीमध्ये सुट्टी.
- ३१ ऑगस्ट २०२२ – गणेश चतुर्थी (गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहेत).