

Bank Holidays in March 2024 | फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सुरू असून मार्च महिना सुरू होणार आहे. मार्चमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असल्यास सुट्टीचे कॅलेंडर पाहून आत्तापासूनच नियोजन करावे. पुढील महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये देशभरात किमान 14 दिवस बँका बंद राहतील. या महिन्यात शिवरात्रीसोबतच होळीचा सणही असतो. राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्यांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारीही बँका बंद राहतील. दर रविवारी बँकेला सुट्टी असते. बँक सुट्ट्यांचे कॅलेंडर भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) जारी करते. जाणून घेऊया मार्च महिन्यातील सुट्ट्या.
1 मार्च : चपचार कुट (मिझोरम)
3 मार्च : रविवार
8 मार्च : महाशिवरात्री
9 मार्च : महिन्याचा दुसरा शनिवार
10 मार्च : रविवार
17 मार्च : रविवार
22 मार्च : बिहार दिन (बिहार)
23 मार्च : महिन्याचा चौथा शनिवार
24 मार्च : रविवार
25 मार्च : होळी
26 मार्च : याओसांग दुसरा दिवस/होळी (ओडिशा, मणिपूर, बिहार)
27 मार्च : होळी (बिहार)
29 मार्च : गुड फ्रायडे
31 मार्च : रविवार
मार्चमध्ये 14 दिवस बँकेला सुट्टी असली तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. बँकेच्या सुट्टीच्या दिवशीही तुम्ही तुमचे महत्त्वाचे काम ऑनलाइन बँकिंगद्वारे पूर्ण करू शकता. बँक बंद होण्याच्या तारखा अगोदर जाणून घेतल्यास तुम्हाला फायदा होईल की तुम्ही तुमच्या कामाचे नियोजन सहज करू शकाल. बँकेच्या सुट्ट्यांच्या वरील यादीमध्ये तुम्हाला सामान्य माहिती देण्यात आली आहे. पण काही राज्यांमध्ये सुट्टीच्या तारखेत बदल होऊ शकतो. त्यामुळे बँक बंद होण्याच्या अचूक माहितीसाठी तुमच्या बँकेच्या वेबसाइट किंवा शाखेशी संपर्क साधणेही महत्त्वाचे आहे.
हेही वाचा – Daily Horoscope 23 February 2024 : आजचा दिवस ‘या’ राशींसाठी खास! करिअर, आर्थिक स्थिती राहील मजबूत
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वर्षभरातील बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. ही यादी राष्ट्रीय/राज्यीय सुट्ट्या, धार्मिक सण, बँकांच्या गरजा आणि सरकारी घोषणा तसेच इतर बँकांशी समन्वय अशा विविध घटकांवर अवलंबून असते. सुट्ट्यांची यादी आरबीआयने अधिकृतपणे जाहीर केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!