

Death threat to Maharashtra CM Eknath Shinde : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी मिळाली आहे. शिंदेंना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती गुप्तचर विभागाला (Intellenge Bureau) मिळाली आहे. मुख्यमंत्र्यांना आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचाही कट रचण्यात आल्याचीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यामुळे पोलीस सतर्क झाले असून यासंबंधी तपास सुरू आहे. यापूर्वी शिंदेना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. शिवाय काही दिवसांपूर्वीही शिंदेना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात पाठवण्यात आले होते. या पत्रासह धमकीचा एक फोनही आला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेकडे खास लक्ष दिले जाणार आहे.
तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या
मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना तीन वेळा जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. एकदा आषाढी एकादशीला पंढरपूरच्या दौऱ्यावर असतानाही त्यांना मारण्याचा कट रचला गेला. गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने तेही नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्य पोलिसांना नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यास सांगितले आहे.
हेही वाचा – विमानात फोन Flight Mode वर का ठेवला जातो? इथं जाणून घ्या!
दुसरीकडे, एनआयएने राज्यांच्या एटीएस, पोलिस, ईडी यांसारख्या एजन्सींच्या मदतीने पीएफआयच्या विरोधात छापे टाकले आहेत. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पीएफआयची कार्यालये सील करून या संघटनेचे कंबरडे मोडले जात आहे. अशा स्थितीत त्यांना जीवे मारण्याची धमकी कोण देत आहे आणि त्यामागे कोणती संघटना आहे का, एक-दोन-तीन जणांच्या मनात अशी काही योजना आहे का, याची माहिती घेण्याचा प्रयत्न या सर्व यंत्रणा करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी. निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली धमकी. आत्मघातकी स्फोट घडवून जीवे मारण्याचा कट रचला असल्याचे सांगितले. तपास सुरू.
— Vijaysinh Holam (@vijayholamMT) October 2, 2022
पीएफआय तळांवर एनआयए आणि राज्य एटीएसच्या कारवाईनंतर, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात निषेध केला. दरम्यान, एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये हे कामगार ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देताना ऐकू आले आहेत. यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेत पीएफआय कामगारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.