चमकोगिरी भोवली..! CM एकनाथ शिंदेंच्या डुप्लिकेटवर गुन्हा दाखल; ‘हे’ आहे कारण

WhatsApp Group

Maharashtra CM Eknath Shindes Duplicate : असं म्हणतात की जगात प्रत्येकाचा डुप्लिकेट असतो, मग तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असू द्या. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी दिसणारी व्यक्ती पुण्यात राहत आहे. त्यांचं नाव विजय माने आहेत, मानेंविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने आणि आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बरेच साम्य आहे. विशेष म्हणजे तेही एकनाथ शिंदेंसारखे ‘टिळा’ लावतात आणि पांढरे कपडे घालतात. शिंदे वापरत असलेल्या चष्म्यासारखाच माने चष्माही लावतात.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी विजय माने नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, माने यांनी सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत पोजही दिली होती त्यापैकी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. तो व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – VIDEO : रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी हाणामारी..! पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव सोहळ्यात ‘डुप्लिकेट’ मुख्यमंत्र्यांनी लोकप्रियता मिळवली. शहरातील अनेक कार्यक्रमांनाही त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माने यांना अनेक उद्घाटनांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, बंडगार्डन पोलीस ठाण्यातील तक्रार शरद मोहोळ याच्याशी संबंधित आहे. कलम ४१९, ५११, ४६९, ५०० आणि ५०१ आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मानेंची प्रतिक्रिया

“मी छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्री राम यांच्या पावलावर पाऊल ठेवणारा भाजपचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझा चेहरा आमच्या मुख्यमंत्र्यांसारखाच आहे. त्यांचा आणि समाजसेवेचा मार्ग मी अवलंबतो. तो फोटो कुणीतरी पोलीस ठाण्यात काढून सर्वत्र पसरवला. यात माझा दोष नाही. हा फोटो माझ्या सोशल मीडियावरून शेअर केलेला नाही. यामुळे मुख्यमंत्री किंवा कोणाला वाईट वाटले असेल तर मला माफी मागायची आहे”, असं माने यांनी सांगितलं.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment