

CM Eknath Shinde On Party Name : महाराष्ट्रातील आगामी पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या गटाला चिन्ह वाटप केले आहे. ठाकरे गटाला निवडणूक चिन्हासह पक्षाचे नवीन नावही देण्यात आले आहे. ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नवे नाव मिळाले आहे. त्याचवेळी शिंदे गटालाही नवे स्थान मिळाले आहे. निवडणूक आयोगाने त्यांना बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले आहे.
आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हटले, “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार….”
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय.
आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार…. #बाळासाहेबांची_शिवसेना pic.twitter.com/8UwEMxP3VC— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 10, 2022
हेही वाचा – Amitabh Bachchans 80th Birthday : बर्थडे ‘बिग बीं’चा आणि गिफ्ट चाहत्यांना..! फक्त ८० रुपयांत मिळणार….
अंधेरीची पोटनिवडणूक…
३ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. आतापर्यंत शिवसेनेचे रमेश लटके या जागेवरून आमदार होते. रमेश हे कुटुंबासह दुबईला गेले होते, तेथे १२ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. निवडणूक आयोगाने येथे ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शिंदे गट आणि भाजपने मिळून माजी नगरसेवक मुरजी पटेल यांना येथून आपले संयुक्त उमेदवार केले आहे. पटेल यांच्यासमोर उद्धव गटाचे उमेदवारही असतील. उद्धव गटाला काँग्रेस, राष्ट्रवादीचाही पाठिंबा मिळाला आहे. उद्धव ठाकरे पायउतार झाल्यानंतर आणि शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. अशा स्थितीत दोन्ही गटांसाठी ही निवडणूक अग्निपरीक्षेपेक्षा कमी नाही.
या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. याबाबत दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हावर आपला दावा मांडला होता. हे पाहता निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह दोन्ही गोठवून दोन्ही गटांकडून तीन पर्यायी नावे व चिन्हे मागवली होती.