सावधान..! कोरोनाच्या ‘नव्या’ प्रकारामुळं धडधड वाढली; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय!

WhatsApp Group

COVID 19 Variant Omicron BF.7 : भारतात कोरोनाव्हायरस (COVID-19) संसर्गाच्या ताज्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट होत आहे. गेल्या २४ तासांत देशात २०६० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यादरम्यान, Omicron च्या BF.7 या नवीन व्हेरिएंटने जगभरातील देशांची तसेच भारताची चिंता वाढवली आहे. गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने देशातील BF.7चे पहिले प्रकरण शोधून काढले आहे. हा प्रकार अत्यंत सांसर्गिक असल्याचे मानले जाते, म्हणजेच हा व्हेरिएंट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये खूप वेगाने पसरतो.

BF.7 प्रथम कुठे मिळाला?

ओमिक्रॉनचा हा BF.7 प्रकार प्रथम मंगोलियामध्ये उदयास आला आणि आता तो अनेक देशांमध्ये पसरला असून नवीन धोका निर्माण झाला आहे. चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे वाढण्यासाठी या प्रकारालाही जबाबदार धरले जात आहे. याशिवाय हा प्रकार अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियममध्येही वेगाने पसरत आहे. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने सांगितले की, एकूण कोविड प्रकरणांपैकी ५.३ टक्के रुग्णांना BF.7 ची लागण झाल्याचे आढळले आहे. तो BQ.1 आणि BQ.1.1 सह BF.7 चे सतत निरीक्षण करत आहे.

भारतात काय परिस्थिती आहे?

BF.7 व्हेरियंट भारतातही सापडला आहे. लाइव्हमिंटच्या अहवालानुसार, डॉ. संजय ढल म्हणाले, “जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) यापूर्वी Omicron, BF.7 च्या या उप-प्रकाराविषयी चेतावणी दिली आहे. त्यात असे म्हटले आहे की हे प्रकार सध्याच्या सर्व प्रकारांची जागा घेईल. ओमिक्रॉनच्या सर्व प्रकारांप्रमाणे हा व्हेरिएंट रोगप्रतिकारक शक्तीला फसवू शकतो.”

हेही वाचा – दीड महिन्यात १ कोटीहून जास्त ज्येष्ठ नागरिकांचा मोफत एसटी प्रवास!

BF.7 ची लक्षणे काय आहेत?

BF.7 सबव्हेरिअंटच्या लक्षणांमध्ये सतत खोकला, ऐकण्यात अडचण, छातीत दुखणे यांचा समावेश होतो. हा व्हायरस वास ओळखण्याच्या क्षमतेवर देखील परिणाम करू शकतो.

बचाव कसा करायचा?

आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात लोक मोठ्या संख्येने जमतात आणि सोशल डिस्टन्सिग विसरून जातात. हा व्हायरस पसरू नये यासाठी त्यांनी मास्क घालण्याचा आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

Leave a comment