

Dusshera 2022 : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आताच खरेदी करा. दिवाळीपूर्वी त्याचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला सोने खरेदी करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. याचे कारण भारतात सोन्याचा पुरवठा करणाऱ्या तीन विदेशी बँकांनी शिपमेंटमध्ये कपात केली आहे. चीन आणि तुर्कस्तानसारखे देश त्यांच्या कपातीचा आधार बनले आहेत.
या तीन बँका सोन्याचा पुरवठा करतात.
रॉयटर्सच्या मते, भारतात सोन्याचा सर्वाधिक पुरवठा जेपी मॉर्गन, स्टँडर्ड चार्टर्ड आणि आयसीबीसी स्टँडर्ड बँक करतात. या बँका दरवर्षी सणासुदीच्या अगोदर सोन्याच्या खाणीतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतात आणि ते त्यांच्या सुरक्षित तिजोरीत ठेवतात. त्यानंतर जगभरातील देशांमध्ये सोन्याची विक्री होते. मात्र यावेळी हे सोने भारताऐवजी चीन आणि तुर्कस्तानसारख्या देशांमध्ये अधिक पुरवठा होत आहे.
हेही वाचा – एकाच ठिकाणी १६ देव..! दसऱ्याला दुबईत उघडलं हिंदू मंदिर; पाहा Video
सोने-चांदीचे आजचे दर
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सराफा सोमवारी सोन्याच्या स्पॉट किमतीत ८९ रुपयांनी तर चांदीचा भाव ९३० रुपयांनी वाढला आहे. आता शुद्ध सोने ५६,२५४ रुपये प्रति १० ग्रॅम म्हणजेच आतापर्यंतच्या सर्वोच्च दरावरून केवळ ५८६३ रुपयांनी स्वस्त झाले आहे. दुसरीकडे जीएसटी जोडल्यानंतर चांदीची किंमत प्रति किलो ५८,९८६ रुपये झाली आहे. यामध्ये सोनाराचा १० ते १५ टक्के नफा वेगळा आहे. म्हणजेच, १० टक्के नफा घेऊन सोनाराला तुम्हाला सुमारे ६४,८८४ रुपये द्यावे लागतील.