

Gas Cylinder Blast At School In Dadar : दादर येथील एका शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन तीन जण जखमी झाले आहेत. छबिलदास शाळेत हा स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या ४ सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की शाळेच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि भिंतीलाही तडे गेले.
या अपघातात शाळेचे तीन कर्मचारीही जखमी झाले आहेत. ज्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा स्फोट झाला ही दिलासादायक बाब आहे. या काळात शाळेत मुले नसतात. सध्या शाळेतही दिवाळीची सुट्टी सुरू असल्याने शाळा बंद होती. स्फोटाशी संबंधित व्हिडिओ समोर आला आहे. स्फोटामुळे शाळेचे मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला? याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा – Tata ग्रुपचा ‘मोठा’ प्लॅन..! ४५,००० महिलांना मिळणार नोकऱ्या; वाचा!
#Mumbai | #Fire broke out on the terrace of Chhabildas English Medium School on Nov 2 due to an explosion in an LPG gas cylinder
Three people got injured & admitted to Sion Hospital. Two cars parked on the school premises damaged: #BMC #MumbaiFire #MumbaiNews #MumbaiCity pic.twitter.com/rNYjI1SqVF
— Free Press Journal (@fpjindia) November 2, 2022
Three labourers were injured after a gas cylinder exploded on the second floor of Chhabildas School Akshikar Tamhane Community Hall in #Dadar West early on Wednesday morning. pic.twitter.com/GLnQPglyH0
— Richa Pinto (@richapintoi) November 2, 2022