

Gram Panchayat Election : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. या निकालांमध्ये सर्वात प्रमुख पक्षांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली. अनेक नावाजलेल्या व्यक्ती या निवडणुकांमुळे केंद्रस्थानी आल्या आहेत. प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे नावही आता या निवडणुकींदरम्यान घेतले जात आहे. याचे कारणही महत्त्वाचे आहे.
इंदुरीकर महाराजांच्या सासूबाई बनल्या सरपंच!
इंदुरीकर महाराज यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार यांचे नशीब उघडले आहे. शशिकला पवार या सरपंच बनल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी अपक्ष म्हणून त्यांनी सरपंचपदासाठी अर्ज भरला होता. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायतीत शशिकला पवार या सरपंच म्हणून निवडून आल्या आहेत.
हेही वाचा – Ration Card : मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी सर्वात वाईट बातमी..! ८० कोटी लोकांना बसणार फटका
निळवंडे ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीत शशिकला पवार यांच्यावर ग्रामस्थांनी पूर्णपणे विश्वास दाखवला आहे. प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख-इंदुरीकर हे शशिकला पवार यांचे जावई आहेत. शशिकला पवार यांची निवड अपक्ष म्हणून झाली असली, तरी इंदुरीकर महाराजांचा लोकांवरील प्रभाव हे पवार यांच्या जिंकण्याचे कारण बोलले जात आहे.