

ISIS India Terrorist Arrest : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशात एक मोठी दहशतवादी साजिश उधळून लावत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून चाललेल्या गुप्त ऑपरेशनदरम्यान दिल्ली, मुंबई आणि झारखंडमधील विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. यामध्ये ISIS शी संबंधित स्लीपर सेलमधील 5 जण अटक झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील दोन दहशतवाद्यांना दिल्लीमधून, तर एकाला झारखंडच्या रांची येथून ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आफताब, सूफियान (दोघेही मूळ मुंबईचे रहिवासी) आणि दानिश (रांचीचा रहिवासी) अशी आहेत. उर्वरित दोन दहशतवाद्यांविषयी तपास सुरू आहे.
3 राज्यांत एकाचवेळी छापेमारी
स्पेशल सेल आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी मिळून दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांकडून शस्त्रे स्फोटके आणि केमिकल IED बनवण्यासाठी आवश्यक साहित्य जप्त करण्यात आले आहे.
मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी
पोलीस तपासानुसार, हे दहशतवादी देशात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ल्याची तयारी करत होते. विशेषतः दिल्ली, मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये हल्ला घडवण्याचा कट रचला जात होता. अटकेतील आफताब आणि सूफियानकडे शस्त्रे व IED बनवण्याचे साहित्य, तर दानिशच्या ठिकाणाहून केमिकल IED बनवण्यासाठी रसायने, एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस सापडले आहे.
हेही वाचा – नेपाळमध्ये हिंसक आंदोलनात 30 जणांचा मृत्यू, महाराष्ट्राचे 300 लोक अडकल्याची माहिती
ISIS स्लीपर सेलचा भंडाफोड
सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले पाचही दहशतवादी ISIS च्या स्लीपर सेलचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे मुख्य काम म्हणजे भारतात नव्या दहशतवाद्यांची भरती करणे, सोशल मीडिया व डार्क वेबद्वारे संपर्क साधणे, आणि पुढील हल्ल्यांसाठी तयारी करणे.
सध्या स्पेशल सेल तपासत आहे की त्यांनी आतापर्यंत किती लोकांना ISIS मध्ये भरती केलं आहे आणि कोणत्या ठिकाणी रेकी करून संभाव्य टार्गेट ठरवले होते. काही इतर संशयितांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा