

Jai Jai Maharashtra Maza Song : महाराष्ट्र सरकार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत गुंतले आहे. राज्याचे माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, ”राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणे असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो.” सरकारशी संबंधित सर्व औपचारिक कार्यक्रमांमध्ये हे गीत वाजवले जाईल.
जय जय महाराष्ट्र माझा हे कवी राजा बढे यांनी लिहिलेले असून ते महाराष्ट्र गीत म्हणूनही ओळखले जाते. हे गाणे शाहीर म्हणून ओळखले जाणारे कृष्णराव साबळे यांनी गायले होते. २०२२ हे त्यांचे शताब्दी वर्ष ३ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे. प्रसिद्ध संगीतकार श्रीनिवास खळे यांनी हे गीत संगीतबद्ध केले असून सध्या अनेक कार्यक्रमांमध्ये ते अनधिकृतपणे गायले जाते. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले, तेव्हा दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गीत गायले होते.
हेही वाचा – VIDEO : नाटकात ‘सीते’चा लावणीवर ठेका; मराठवाडा विद्यापीठात ‘अभाविप’नं बंद पाडलं नाटक!
#Maharashtra to get its own state song. #JaiJaiMaharashtraMazha may be given the official status of a state song. So far, 11 states in India have an official state song. Story for @htTweets@HTMumbaihttps://t.co/wGc3CwK25q#Mumbai #Marathipride
— Dhaval Kulkarni (धवल कुलकर्णी) 🇮🇳 (@dhavalkulkarni) October 17, 2022
शाहीर साबळे यांचे २०१५ मध्ये निधन झाले. साबळेंचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गाणे रिलीज होणार आहे.