

Kamlesh Kamtekar : नवीन वर्ष सुरू होत आहे. लोकांना मागील काळात भयानक अनुभव आले, मग तो कोरोना असो वा रोजगार. अनेक मोठ-मोठ्या कंपन्यांनी कपात केली. गलेगठ्ठ पगार असलेले कामावरून कमी करण्यात आले. त्यांना तशीच दुसरी नोकरी शोधण्यात आलेले अपयश बरंच काही शिकवून गेले. त्यातीलच एकाचं नाव कमलेश कामतेकर.
14 वर्षांचा कामाचा अनुभव असलेला ग्राफिक डिझायनर कमलेश कामतेकर कपातीमुळे नोकरी गमावल्यानंतर ऑटो-ड्रायव्हर बनतो. असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या कमलेशची पाच महिन्यांपूर्वी नोकरी गेली. त्याने आपला अनुभव लिंक्डइनवर शेअर केला.
कमलेश या अनुभवात म्हणाला, “कंपनीतील खर्चात कपातीमुळे माझी नोकरी गमावून जवळपास 5 महिने पूर्ण झाले आहेत. ग्राफिक डिझायनिंगमध्ये 14 वर्षांचा अनुभव असलेलो असिस्टंट क्रिएटिव्ह मॅनेजर म्हणून मी माझी पूर्वीची नोकरी गमावल्यानंतर नवीन नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पाच महिन्यांनंतरही मला नवीन नोकरी मिळाली नाही. मी माझ्या मित्रांसह अनेक संदर्भांसह प्रयत्न केला होता. पण अजूनपर्यंत मला नवीन नोकरी मिळाली नाही. मी लिंक्डइनवर देखील बरेच अर्ज केले होते, परंतु प्रत्येक वेळी माझा अर्ज नाकारला जात होता.’’
Heartbreaking!
— Prince Pappu (@RaGaDynasty) December 30, 2024
Kamlesh Kamtekar, a graphic designer with 14 years of experience, turns auto driver after being laid off & rejected by multiple companies. Despite 28K LinkedIn followers, he couldn’t find a job for 5 months. A stark reminder of today’s harsh realities.💔 pic.twitter.com/ROQgy50wS3
कमलेशला नोकरी न मिळण्याचे एक कारण म्हणजे त्यांच्या कामाच्या अनुभवाला साजेशी भूमिका नसणे. त्याला पैसे देण्यासाठी बहुतांश कंपन्यांकडे बजेटच नव्हते. “माफ करा तुमच्या सध्याच्या भूमिकेसाठी आमच्याकडे बजेट नाही किंवा तुमच्या अनुभवानुसार आमच्याकडे अशी भूमिका नाही.” या प्रकारचा अभिप्राय कमलेशला गेल्या 5 महिन्यात मिळात होता.
यानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवण्याचा विचार केला. “या फीडबॅकनंतर, मला वाटले की, कुठेतरी काम करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याच कमी पगारात पैसे का कमवू नये? निदान माझी स्वतःची कमाई असेल. मग मी ठरवले “भाड मे जाये अबका खुद का बिजनेस करूंगा” पण माझ्या सध्याच्या क्षेत्रात नाही. म्हणून मी माझ्या सर्व डिझाइनिंग कौशल्यांचा त्याग करून ऑटो रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. माझ्या नवीन व्यवसायासाठी मला तुमचे आशीर्वाद द्या. धन्यवाद”, असे कमलेशने म्हटले.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!