लाडकी बहीण योजनेची E-KYC करताना Error येतोय? संपूर्ण प्रोसेस, Error चं कारण आणि उपाय, जाणून घ्या

WhatsApp Group

Ladki Bahin Yojana KYC : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. अपात्र लाभार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे, सरकारने आता सर्व पात्र महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य केली आहे. ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास, महिलांना दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये थांबवले जातील, असा इशारा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिला आहे.

ई-केवायसी करताना Error का येतो?

अनेक महिलांनी वेबसाइटवरून e-KYC करण्याचा प्रयत्न केला असता, Error Message येत असल्याचं समोर आलं आहे. यामागे अनेक कारणं असू शकतात, जसे की:

  • आधार क्रमांक चुकीचा भरला जाणे
  • मोबाईल नंबर आधारशी लिंक नसणे
  • वेबसाइटवरील तांत्रिक बिघाड
  • लाभार्थ्याचे नाव यादीत नसणे
  • आधीच KYC पूर्ण झालेली असणे

हे Errors टाळण्यासाठी पुढील स्टेप्स काळजीपूर्वक फॉलो करा.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘रेल नीर’च्या बाटल्यांची किंमत झाली स्वस्त, आता 15 रुपये नाही…

लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रोसेस – Step by Step Guide

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:
👉 https://ladakibahin.maharashtra.gov.in

2. e-KYC बॅनरवर क्लिक करा.

3. तुमचा आधार क्रमांक आणि Captcha Code टाका → Send OTP वर क्लिक करा.

4. OTP मोबाईलवर आल्यावर → तो भरून Submit करा.

5. प्रणाली तपासेल की KYC आधी झाली आहे का:

  • आधी झाली असल्यास – संदेश येईल: “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे”
  • नसल्यास – आधार क्रमांक पात्र यादीत आहे का हे पाहिलं जाईल.

6. पुढे, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड टाकून → OTP द्वारे Submit करा.

7. नंतर, तुमचा जात प्रवर्ग निवडा आणि पुढील घोषणा (Declaration) करा:

  • कुटुंबातील कोणीही सरकारी/निवृत्त कर्मचारी नाही.
  • केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला लाभ घेत आहे.

8. सर्व माहिती भरून → Submit वर क्लिक करा.

9. यशस्वी KYC नंतर स्क्रीनवर संदेश दिसेल:
“Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे”

ई-केवायसी केली नाही, तर काय होईल?

जर महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्या योजनेच्या पात्रतेबाहेर जातील. परिणामी, महिन्याला मिळणारे 1500 रुपये थांबतील. त्यामुळे 2 महिन्यांच्या मुदतीआधीच e-KYC पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment