‘राम नाम सत्य है’ म्हणताच तिरडी हलू लागली आणि मग पुढं…!

WhatsApp Group

Maharashtra Akola Man Alive During Last Journey : महाराष्ट्रातील अकोल्यात भयंकर प्रकार घडला आहे. एक माणूस मागील काही दिवसांपासून खूप आजारी होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत सतत खालावत गेली. एक वेळ अशी आली की डॉक्टरांनी त्याची नाडी मोजली आणि त्याला मृत घोषित केले. त्याला तिरडीवर घेऊन जात होते. स्मशानभूमीच्या वाटेवर ‘राम नाम सत्य है…’ असे लोक म्हणत होते. अचानक तिरडी हलू लागली. घाबरलेले लोक जवळच्या गावातील मंदिरात पोहोचले. मंदिराच्या पायऱ्यांवर तिरडी ठेवली. थोड्या वेळाने तिरडीवरचा माणूस उठून उभा राहिला.

कुठे घडली घटना?

ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विवरा गावात बुधवारी घडली. प्रशांत मेश्रे असे तिरडीवरून उठलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रशांत मेश्रे हा होमगार्ड आहे. काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांतच्या रक्तवाहिन्या थांबल्या होत्या. शिरा चोकअप झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रशांतचे वय २५ वर्षांचे होते. तारुण्यात असे निघून गेल्याचे वृत्त समजताच घरच्यांची दुरवस्था झाली. त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू झाली. प्रशांतच्या मित्रमंडळींनीही त्याच्या मृत्यूची बातमी ऐकून ‘मिस यु प्रशांत’ असे स्टेटस ठेवायला सुरुवात केली होती.

हेही वाचा – भारत-नेदरलँड्स वर्ल्डकप मॅचदरम्यान BCCI नं घेतला ‘ऐतिहासिक’ निर्णय!

यानंतर प्रशांतला तिरडीवर झोपवले, तेव्हा त्याच्या शरीरात हालचाली सुरू झाल्या. गावकऱ्यांना काही समजले नाही. घाबरून ते जवळच्या गावातील मंदिरात पोहोचले. मंदिराच्या पायऱ्यांवर तिरडी ठेवली. त्यानंतर प्रशांत उठून उभा राहिला. असा चमत्कार गावकऱ्यांनी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. प्रशांत जीवंत असल्याची बातमी काही वेळातच गावभर पसरली. हे दृश्य पाहण्यासाठी संपूर्ण गाव मंदिराजवळ जमा झाले. एवढा जमाव जमला की गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

Leave a comment