सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाला मिळालं नवीन नाव..! शिंदे सरकारचा निर्णय

WhatsApp Group

Sindhudurg Chipi Airport : शिंदे सरकारची मंगळवारी (२७ सप्टेंबर २०२२) रोजी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या नामकरणाचाही निर्णय झाला. चिपी विमानतळास बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्यात येणार आहे. बॅ. नाथ पै यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. त्यांनी स्वातंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला व वेळोवेळी कारावास भोगला. गोवा मुक्ती संग्रामात देखील ते अग्रेसर होते. स्वातंत्र्योत्तर कालावधीत त्यांनी राजापूर लोकसभा मतदार संघातून प्रतिनिधीत्व केले.

कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बॅरिस्टर नाथ पै यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. हे औचित्य लक्षात घेवून चिपी परुळे येथील ग्रीनफिल्ड विमानतळाला बॅ. नाथ पै विमानतळ असे नाव देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हा प्रस्ताव विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांमधील सदस्यांच्या मान्यतेने केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल.

चिपी विमानतळाबाबत…

  • २७५ हेक्टर व्याप्ती
  • २५०० मीटर लांब आणि ६० मीटर रुंद धावपट्टी
  • एअरबस ए-३२० आणि बोईंग ७७७ प्रकारातील विमाने उतरू शकतात
  • १० हजार चौरस फुट टर्मिनल बिल्डिंग

हेही वाचा – पर्यटनात आपलं राज्य भारी..! महाराष्ट्रानं जिंकला सर्वोत्कृष्ट राज्याचा दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार

  • एकावेळी २०० प्रवाशांचे आगमन आणि २०० प्रवाशांचे निर्गमन हाताळण्याची क्षमता
  • तीन विमाने पार्क करण्याची सोय. दुसऱ्या टप्प्यात ती १५ पर्यंत वाढविली जाणार.
  • नाईट लँडिंग आणि इंधन भरण्यासाठी व्यवस्था
Leave a comment