Maharashtra : कोथिंबीर विकून लातूरचा शेतकरी बनला करोडपती, घेतली SUV गाडी!

WhatsApp Group

Maharashtra Latur Farmer Bcome Crorepati : महाराष्ट्रातील लातूरच्या रमेश विठ्ठलराव या शेतकऱ्याने कोथिंबीरची लागवड करून चांगला नफा मिळवला आहे. कोथिंबीरीच्या लागवडीतून त्यांना यावर्षी 16 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. रमेश 2019 पासून कोथिंबीरीची लागवड करत असून 5 वर्षात त्यांनी 1 कोटी रुपये कमावले आहेत.

या कमाईतून त्यांनी एक एसयूव्ही गाडी आणि घरही खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. ज्या शेतात विठ्ठलराव आता कोथिंबीर पिकवत आहेत, त्याच शेतात पूर्वी द्राक्षे पिकवायची. त्यांनी सांगितले की, 2015 मध्ये त्यांनी 3 एकर क्षेत्रात द्राक्षाची लागवड केली होती. यातून त्यांना 5 लाख रुपये मिळाले. त्यांनी 50 टन द्राक्षे 10 रुपये किलो दराने विकली. मात्र, द्राक्षे पिकवण्यासाठी त्यांना साडेसहा लाख रुपये खर्च आला. यानंतर त्यांनी द्राक्षांची लागवड बंद करण्याचा निर्णय घेतला आणि कोथिंबीरीची निवड केली.

हेही वाचा – Share Market : 4 ऑगस्टला खुला होईल ‘हा’ IPO, होईल तगडी कमाई!

पहिल्या वर्षीच 25 लाख रुपये कमावल्याचे विठ्ठलराव सांगतात. गंमत म्हणजे या शेतीसाठी त्यांनी सुमारे एक लाखाची गुंतवणूक केली होती. पुढील वर्षी 2020 मध्ये त्यांनी 16 लाख, 2021 मध्ये 14 लाख आणि 2022 मध्ये 16 लाख, 2021 मध्ये 14 लाख आणि 2022 मध्ये 13 लाख कमावले. या वर्षी आतापर्यंत त्यांनी 16.30 लाखांची कमाई केली आहे.

कोथिंबीर विकून विठ्ठलरावांनी गावात मोठे घर घेतले आहे. याशिवाय त्यांनी एक एसयूव्हीही खरेदी केली आहे. विशेष म्हणजे शेतकरी पारंपरिक शेती करून तेवढा नफा मिळवू शकत नाहीत. अनेक वेळा शेतकर्‍यांना स्वत:चा खर्च काढणे अवघड होऊन बसते. अशा परिस्थितीत शेतकरीही कर्जाच्या जाळ्यात अडकू लागतो. म्हणूनच विठ्ठलरावांनी अशा शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीपासून दूर जाण्याचा सल्ला दिला आहे आणि अशी पिके घ्यावीत ज्यातून त्यांना अधिक कमाई करता येईल.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment