Maharashtra Monsoon : मुंबईत पावसाचा कहर..! ढगांचा कडकडाट, विजांचा गडगडाट

WhatsApp Group

Mumbai Rains : मुंबईत अनेक ठिकाणी धुवांधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी वाहतूक मंदावलेली आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक आणि प्रामुख्याने रस्तेवाहतुकीवरही झाला. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहने चालवताना अडचण होताना दिसते आहे. हवामान खात्याकडून पश्चिम उपनगरात मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. चार वाजल्यापासून उपनगरात पावसाच्या सरी सुरू आहेत. मुंबई, ठाण्यासह पुण्यात देखील परतीच्या पावसाने हजेरी लावली. बोरिवली, कांदिवली, गोरेगाव आणि अंधेरी इथे चार ते सहा वाजेदरम्यान प्रचंड काळे ढग जमा झाले आणि आकाश अंधारून आले होते. या परिसरात वाहन चालकांना गाडीचे दिवे लावून वाहने चालवावी लागत होती, यामुळे वाहतूक मंद गतीने सुरू होती.

महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनचा कहर सुरूच आहे. पुढील तीन-चार दिवस हा कहर कायम राहणार असून, यावेळेस मान्सून बराच काळ सुरू राहणार असल्याची बातमी आहे. यंदा दिवाळीतही महाराष्ट्रातील अनेक भागात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुण्यात आज (१४ ऑक्टोबर, शुक्रवार) दुपारी ३ वाजता पावसाने धुमाकूळ घातला.

हेही वाचा – BREAKING : मुंबईत सीट बेल्ट लावणं बंधनकारक..! ‘या’ तारखेपासून नियम लागू

https://twitter.com/imdineshdubey/status/15808934076058296

पुण्यात ठिकठिकाणी रस्ते जलमय झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हवामान खात्याने पुण्यासह अनेक भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईतही अनेक भागात पाऊस पडत आहे. मुंबईला लागून असलेल्या ठाण्यातही अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडमधील खोपोली आणि खालापूर भागातही मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मान्सूनचा कालावधी १० दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. परतीचा मान्सून दरवर्षी ४-५ ऑक्टोबरला सुरू व्हायचा. मात्र यंदा हा परतीचा मान्सून आणखी काही दिवस राहणार आहे. अशा स्थितीत आता दिवाळीतही पाऊस पडणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.

Leave a comment