

Maharashtra Government Employees Get Salary Before Diwali : येत्या २२ तारखेपासून दिवाळी सुरू होत असून सणासाठी म्हणून राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन आणि निवृत्ती वेतन देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. एरव्ही ऑक्टोबरचे वेतन नोव्हेंबरमध्ये होत असते. मात्र दिवाळी २२ ऑक्टोबरपासून असल्यामुळे सणानिमित्त खरेदी व इतर कारणांसाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा लाभ जिल्हा परिषद मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्था कृषी विद्यापीठे व अकृषी विद्यापीठे यातील कर्मचाऱ्यांना होईल. वेतन देयके त्वरित कोषागार कार्यालयात दाखल करण्यासंदर्भात देखील सूचना देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – सावधान..! कोरोनाच्या ‘नव्या’ प्रकारामुळं धडधड वाढली; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय!
राज्य शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केलेल्या मागणीची मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी घेतली दखल… ऑक्टोबर महिन्याचे वेतन आणि निवृत्तीवेतन दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय. pic.twitter.com/52RMNl3GKS
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 18, 2022