

Thane Fruit Seller Viral Video : महाराष्ट्रातील डोंबिवली येथे एका फळ विक्रेत्याशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये असे दिसून येते की, फळ विक्रेत्याने गाडीत ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत लघवी केली आणि नंतर हात न धुता त्याने फळे विकण्यास सुरुवात केली.
या व्यक्तीचे वय 20 वर्षे असून अली खान असे त्याचे नाव असून तो डोंबिवलीतील निलजे गावातील लोढा परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करतो. फळ विक्रेत्याची ही कारवाई व्हिडिओमध्ये कैद झाली असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
#Maharashtra : Fruit seller Ali Khan in Thane caught on camera urinating in polythene on the fruit cart , he later uses that water to sprinkle on the fruits …
— Amitabh Chaudhary (@MithilaWaala) September 23, 2024
Aage kuch bol dunga toh vivaad ho jayega !! pic.twitter.com/Trl3G7mLwU
हेही वाचा – कॅन्सर, टीबीसारख्या रोगांवर ‘ट्रीटमेंट’ करणार AI, मुंबई विद्यापीठाचं खास मॉडेल!
या घटनेने डोंबिवलीतील रहिवासी संतप्त झाले आणि त्यांनी खान यांच्या फळांच्या गाडीची तोडफोड सुरू केली.
व्हिडिओ समोर आल्यानंतर लगेचच, स्थानिक लोक खानच्या फळांच्या दुकानात जमा झाले, जिथे त्यांनी त्याच्या मालाची नासधूस केली आणि रागाच्या भरात त्याच्यावर हल्लाही केला. ही बातमी पसरताच राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांना त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करावा लागला.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!