

Nitesh Rane : महाराष्ट्रातील भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राणेंवर भडकाऊ भाषणे करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 302, 153 आणि इतर कलमांखाली राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात मुस्लिमांना खुलेआम धमकी दिली आणि ते ‘चुन चुन कर मारेंगे’ असे सांगितले. त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. एक गुन्हा श्रीरामपूर तर दुसरा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हिंदू समाजातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चानंतर नितेश राणेंची सभा झाली, त्यात त्यांनी मुस्लिमांना खुलेआम धमकावले. राणे म्हणाले, ”आमच्या रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी काही बोलले तर मशिदीत येऊन मारू”
"TUMHARE MASJIDON KE ANDAR AAKE CHUN CHUN KAR MARENGE"
— Darab Farooqui (@darab_farooqui) September 1, 2024
"तुम्हारे मस्जिदों में अंदर आके चुन चुन के मरेंगे"
Nitesh Rane, a BJP MLA, delivered this Hate speech and open threat in Ahmednagar.
They talk of killing Muslims. Then they kill Muslims. And the majority of people support,… pic.twitter.com/x0e6Yy4aT9
हेही वाचा – VIDEO : ‘मी धोनीला माफ करणार नाही, युवराजला भारतरत्न द्या…’, योगराज सिंग पुन्हा व्हायरल!
महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या पैगंबर यांच्यावर भाष्य केल्यानंतर राज्यातील विविध जिल्ह्यात महाराजांच्या विरोधात मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ भाजप नेते नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली समस्त हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला.
2 FIRs have been registered against BJP MLA Nitesh Rane for giving provocative speeches on 2 different occasions in Srirampur and Topkhana police jurisdiction of Ahmednagar district Yesterday. Nitesh Rane took part in the Sakal Hindu Samaj agitation in Ahmednagar and gave… pic.twitter.com/Pjth4dlick
— ANI (@ANI) September 2, 2024
एआयएमआयएम नेते वारिश पठाण यांनी नितीश राणेंचा व्हिडिओ शेअर करत भाजपला निवडणुकीपूर्वी जातीय हिंसाचार घडवायचा आहे असा आरोप केला आहे. नितेश राणेंचे भाषण भडकवणारे असून नितीश यांच्यावर एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!