मराठा आरक्षणासाठी ढवळून निघाली मुंबई! आझाद मैदान फुल्ल, CSMT परिसरात आंदोलकांचा तुफान रस्ता रोको

WhatsApp Group

Maratha Reservation : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा राजधानी मुंबईतील आझाद मैदान दणाणलं आहे. मराठा आरक्षणाचे ठिणगी पुन्हा भडकवणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुख्य मागणीसह इतर मागण्या घेऊन आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे.

आज सकाळपासूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), आझाद मैदान परिसर, मुंबई महानगरपालिका मार्ग, भेंडी बाजार, वाडी बंदर, आणि क्रॉफर्ड मार्केट या परिसरात मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

 भगवे झेंडे, टोपी आणि शेले – मैदानात शिवप्रेमाचं तांडव

हातात भगवे झेंडे, डोक्यावर भगव्या टोप्या, गळ्यात भगवे शेले घालून हजारो मराठा आंदोलकांनी मैदानात हजेरी लावली. “एक मराठा, लाख मराठा”, “मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आहे” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मनोज जरांगे पाटील मैदानात दाखल होताच आंदोलकांनी जोरदार जल्लोष केला.

पाच हजारांची परवानगी पण हजारोंनी मैदान गच्च

मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात फक्त 5000 आंदोलकांना परवानगी दिली होती, मात्र मैदान पूर्णपणे गच्च भरलं असून, पोलिसांच्या अंदाजापेक्षा कितीतरी अधिक लोक उपस्थित आहेत. त्यामुळे मैदानाबाहेरही आंदोलकांची गर्दी साचली असून, पोलिसांनी गर्दी नियंत्रणासाठी ठिकठिकाणी रस्ते अडवले, आणि नागरिकांना पायदळानेच मैदानात जाण्याचे आवाहन केलं आहे.

ड्रोन आणि मोठा पोलीस बंदोबस्त – Mumbai Under Surveillance

गोंधळ टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. शिवाय, जमावावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवले जात आहे. पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र “रास्ता रोको” अद्याप सुरू आहे.

वाहतूक कोंडी – मुंबईकरांची कोंडी

CSMT परिसरात काही आंदोलकांनी रस्त्यावर बसून रस्ता अडवला, त्यामुळे बसगाड्या, खासगी वाहने आणि रिक्षांचा प्रवास पूर्णपणे ठप्प झाला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment