

MP Amol Kolhe On Abdul Sattar : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ गटाचे आमदार आणि राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार सध्या सर्वांच्याच निशाण्यावर आले आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागत आहे. सोशल मीडियावर सत्तारांचा सुप्रिया सुळेंविषयीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अनेक नेते आक्रमक झाले. आता राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनीही सत्तारावर टीका केली.
काय म्हणाले कोल्हे?
अमोल कोल्हे यांनी सत्तारांच्या वक्तव्याविषयी ट्वीट केले आहे. ते म्हणाले, ”इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधानं करणं निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो!”
हेही वाचा – वर्तमानपत्र वाचत असताना व्यक्तीला हार्ट अटॅक..! पाहा ह्रदय पिळवटून टाकणारा Video
इतिहासात डोकावून पाहिलं तर अशा अनेक महिलांनी राष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे, त्यामुळे मंत्रीपदावर असणाऱ्या व्यक्तींनी अशी विधानं करणं निषेधार्ह आहे. या हीन दर्जाच्या भाषेचा व नीच मानसिकतेचा मी तीव्र निषेध करतो!@supriya_sule #AbdulSattar
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) November 7, 2022
महाराष्ट्राच्या राजकारणात याआधी अशी भाषा कोणत्याही नेत्यांनी केली नाही, सत्तारांना शब्द मागे घेण्यासाठी राष्ट्रवादीचा 24 तासांचा अल्टिमेटम दिलाय मात्र हा प्रकार अल्टिमेटमचा नाहीय, अशी भाषा वापरणाऱ्या व्यक्तीचं मंत्रीपद रहावं का? हा प्रश्न आहे #AbdulSattar #supriyasule pic.twitter.com/TXmKWRPcQt
— Tejas Borghareتیجس (@TejasBorghare77) November 7, 2022
नेमके प्रकरण काय?
एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले. ते म्हणाले, “इतकी भिकारXX झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही खोके देऊ. ते आम्हाला खोके बोलू लागले आहेत, आमचे खोके त्यांचे डोके तपासावे लागेल, ज्यांचे डोके तपासावे लागेल खोक्याची आठवण येऊ लागली आहे त्यांच्यासाठी सिल्लोडमध्ये रुग्णालय उघडावा लागेल. त्या दवाखान्यात खोके खोके बोलतात त्यांचे डोके तपासावे लागले. हे भिकारXX लोक, राजकारणच भिकारी धंदा आहे. आम्ही दररोज लोकसभा, विधानसभेसाठी मतांची भीक मागतो.”