मुंबईकरांना मिळणार 268 एसी लोकल ट्रेन, 24,000 कोटींचा प्रकल्प मंजूर!

WhatsApp Group

Mumbai AC Local Trains : मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर आहे. महाराष्ट्र सरकारने 24,000 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाला मंजुरी दिली असून, या अंतर्गत मुंबईकरांना तब्बल 268 पूर्णपणे वातानुकूलित लोकल ट्रेन कोचेस मिळणार आहेत.

मुंबईचे उपनगरीय रेल्वे जाळे म्हणजे शहराचे खरं जीवनवाहन मानले जाते. या लोकल ट्रेनचा दररोज लाखो प्रवासी वापर करतात. त्यामुळेच या सेवेमध्ये सुधारणा ही काळाची गरज होती, जी आता पूर्ण होत आहे.

MUTP फेज 3 आणि 3A अंतर्गत प्रकल्प

ही सुधारणा मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टच्या (MUTP) तिसऱ्या आणि 3A टप्प्यांतर्गत करण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत नवीन रेक्समध्ये मेट्रोसारखे स्वयंचलित दरवाजे, अत्याधुनिक प्रवासी सुविधा, आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षितता उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, “या नव्या एसी लोकल ट्रेनसाठी प्रवास भाडे जुनेच राहणार आहे.” त्यामुळे प्रवाशांवर कोणताही आर्थिक बोजा पडणार नाही.

वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया : Metro Line 11 ला मंजुरी

त्याचवेळी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन इन्फ्रास्ट्रक्चरच्या बैठकीत Metro Line 11 या महत्त्वाच्या प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. 16 किलोमीटर लांबीचा हा मेट्रो कॉरिडॉर पूर्णपणे अंडरग्राउंड असणार असून तो वडाळा डिपोपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंत धावणार आहे.

हेही वाचा – Mutual Fund गुंतवणुकीत नवा ट्रेंड! आता गुंतवणूकदार ‘ही’ युक्ती वापरून मिळवतायत मोठा परतावा

हा प्रकल्प जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) च्या सहकार्याने पूर्ण होणार असून, यासाठी एकूण 24000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नवी मुंबई विमानतळासाठी एलिवेटेड रोड

मुंबई आणि ठाणेकरांसाठी आणखी एक महत्त्वाची घोषणा म्हणजे – ठाणेपासून नव्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत 25 किमी लांबीचा उंचावलेला रस्ता (Elevated Corridor) बांधण्यात येणार आहे. यामुळे विमानतळापर्यंत पोहोचण्याचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचणार आहे.

पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचा विस्तार

या बैठकीत पुणे-लोणावळा मार्गावरही अतिरिक्त रेल्वे लाईन्स घालण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी सुटणार असून औद्योगिक, निवासी व व्यावसायिक विकासास चालना मिळणार आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी निवेदनानुसार, “या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक प्रणालीत मोठा बदल होईल. मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई व नागपूरसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये शाश्वत आणि आधुनिक पायाभूत सुविधा उभ्या राहतील.”

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment