मुंबईकरांनो! वर्षानुवर्षांची प्रतीक्षा अखेर संपली, फडणवीस सरकारकडून ऐतिहासिक घोषणा!

WhatsApp Group

Mumbai Local Train Upgrade : मुंबईकरांची वर्षानुवर्षांची एक महत्त्वाची मागणी अखेर पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई लोकल ट्रेनसंदर्भात एक ऐतिहासिक घोषणा करून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. आता लवकरच मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये मेट्रोप्रमाणे एसी डबे आणि स्वयंचलित दरवाजे असतील आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या बदलांसाठी कुठलाही अतिरिक्त भुर्दंड म्हणजेच भाडेवाढ होणार नाही!

मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत ही मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर, जिथे ५ जणांचा मृत्यू झाला, अशा घटना रोखण्यासाठी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोसारख्या सुविधांमुळे प्रवाशांचा जीव वाचवणे शक्य होईल.

रेल्वेमंत्री लवकरच देतील अधिकृत घोषणा

फडणवीस म्हणाले की यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक निर्णय दिला आहे. रेल्वेमंत्री वैष्णव लवकरच मुंबईत येऊन याची अधिकृत घोषणा करतील.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की हे नवीन कोच पूर्णपणे नवे असतील. जुन्या ट्रेनमध्ये बसवले जाणारे नव्हे,  यामध्ये आधुनिकतम सुविधा असतील. तसेच, भाडेवाढ न करता ही सेवा दिली जाणार असल्यामुळे सामान्य मुंबईकर प्रवाशाला कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

इतर महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांची घोषणाही

मुख्यमंत्र्यांनी इतर अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचीही माहिती दिली.

  • कोलाबा-बीकेसी-आरे मेट्रो लाईन ३ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्णपणे सुरू होईल.
  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नोव्हेंबर २०२५ पर्यंत सुरू होणार.
  • वाढवन बंदर प्रकल्पही वेगाने सुरू असून तो जगातील टॉप-१० पोर्ट्समध्ये सामील होईल.

या सर्व प्रकल्पांमुळे मुंबई आणि महाराष्ट्राची समुद्री आणि हवाई क्षमता प्रचंड वाढणार आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment