VIDEO : मुंबईत अचानक बदललं हवामान, धुळीच्या वादळानंतर जोरदार पाऊस!

WhatsApp Group

Mumbai Rain : मुंबईत आज सोमवारी हवामानात अचानक बदल झाला. धुळीच्या वादळानंतर पाऊसही सुरू झाला. सोसाट्याचा वारा आणि वादळामुळे दिवसा रात्रीसारखे दृश्य दिसू लागले. सगळीकडे अंधार होता. जोरदार वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे ढग उडताना दिसत होते.

धुळीच्या वादळानंतर मुंबईतील संपूर्ण आकाश धुळीने भरून गेले होते, तर काही वेळापूर्वीच ऊन पडले होते. त्यानंतर अनेक भागात पाऊस सुरू झाला.

हेही वाचा – टॅक्स वाचवणारी पोस्ट ऑफिसची तगडी स्कीम..! कमाईची गॅरंटी, जाणून घ्या डिटेल्स

हवामान खात्याचा इशारा

पुढील 3 ते 4 तासांत पालघर आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. बाहेर जाताना काळजी घ्या.

सोसाट्याच्या वाऱ्यानंतर मरिन ड्राइव्ह परिसरात धुळीचे वादळ उठले, त्यानंतर जोरदार पाऊसही सुरू झाला. वादळामुळे नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 5 मध्येही एक झाड उन्मळून पडले असून, यात कोणी जखमी झाल्याचे वृत्त नाही.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे जॉईन करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment