मुंबईत वाढदिवस साजरा करताना 21 वर्षीय विद्यार्थ्याला जिवंत जाळलं? मित्रांकडून अमानुष कृत्य, सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक दृश्य

WhatsApp Group

Mumbai  Student Burnt Alive :  मुंबईत एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 वर्षीय अब्दुल रहमान याला त्याचेच पाच मित्र वाढदिवसाच्या बहाण्याने खाली बोलावून जिवंत पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून परिसरात प्रचंड संतापाचे वातावरण आहे.

घटनेचा खळबळजनक क्रम

25 नोव्हेंबरची रात्र… अब्दुल रहमानचा वाढदिवस. त्याचे पाच मित्र मध्यरात्री त्याला वाढदिवस साजरा करण्यासाठी खाली बोलावतात. सुरुवातीला वाढदिवसाचा माहोल असल्यासारखे दिसत होते—अंड्यांचा मारा, दगड फेकणे… पण काही क्षणात वातावरण भीषण बनते.

साक्षीदारांच्या आणि कुटुंबाच्या मते, मित्रांनी स्कूटरमधून ज्वलनशील द्रव काढून अब्दुलच्या अंगावर ओतले आणि क्षणात त्याला पेटवून दिले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो जिवंत जळत धावत असल्याचे अत्यंत धक्कादायक दृश्य दिसते.

पीडिताची अवस्था आणि पोलिसांची कारवाई

अब्दुल रहमानला गंभीर भाजल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या अमानुष कृत्यात सहभागी असलेल्या सर्व पाच आरोपींना अटक केली आहे. त्यांना 29 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीनंतर आणखी माहितीची प्रतीक्षा आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment