मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरनं उचललं टोकाचं पाऊल..! २३व्या मजल्यावरून मारली उडी

WhatsApp Group

Mumbai Builder Paras Porwal Dies : मुंबईत एका प्रसिद्ध बिल्डरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बांधकाम व्यावसायिक पारस पोरवाल यांनी आत्महत्या केली आहे. पोरवाल यांनी निवासी इमारतीच्या २३व्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली. पारस पोरवाल हे दक्षिण मुंबईतील सर्वात प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून ओळखले जात होते. मात्र त्याने एवढे मोठे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

पोरवाल यांनी भायखळा येथील निवासी इमारतीच्या २३व्या मजल्यावरून सकाळी ६-७ वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येमुळे पोरवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी या घटनेमुळे बिल्डर वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. पारस पोरवाल यांनी दक्षिण मुंबईत अनेक इमारती बांधल्या आहेत.

हेही वाचा – मुंबईत ‘या’ तीन ठिकाणी बॉम्ब ठेवलाय..! पोलिसांना फोन आल्यानंतर उडाली खळबळ

पोलिसांना पोरवाल यांची सुसाईड नोट सापडली आहे. यात आत्महत्येसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, कोणाचीही चौकशी करू नये, असे लिहिलेले आहे. दरम्यान, पोरवाल यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याचे कुटुंब, मित्र, व्यावसायिक भागीदार यांची चौकशी केली जात आहे. तो काही तणावाखाली होता का, त्याला कशाची चिंता होती का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment