नाशिकमध्ये भीषण दुर्घटना : 600 फूट दरीत कार कोसळली; सहा जणांचा जागीच मृत्यू

WhatsApp Group

Nashik Saptashrungi Ghat Accident : नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तरशृंगी गड घाटात रविवारी दुपारी एका कारचा भीषण अपघात झाला. तब्बल 600 फूट खोल दरीत वाहन कोसळल्याने सहा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतक सर्वजण निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघात दुपारी सुमारे 4 वाजता झाला. सात प्रवासी असलेली टोयोटा इनोव्हा कार एका वळणावरून नियंत्रण सुटल्याने खोल दरीत जाऊन कोसळली. वाहनाचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला असून घटनास्थळी अतिशय हृदयद्रावक परिस्थिती होती.

मृतांची नावे पुढीलप्रमाणेः

  • किरण उर्फ किर्ती पटेल (50)
  • रसीला पटेल (50)
  • विठ्ठल पटेल (65)
  • लता पटेल (60)
  • वचन पटेल (60)
  • मनीबेन पटेल (70)

यातील सर्वजण कुटुंबातील सदस्य असून तीर्थयात्रेसाठी निघाले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येते.

नाशिकचे पोलीस अधीक्षक बलासाहेब पाटील स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून पोलीस दल आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाच्या रेस्क्यू ऑपरेशनची देखरेख करत आहेत. दरी खोल आणि धोकादायक असल्यामुळे बचावकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली शोकभावना

या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व मृतकांच्या कुटुंबियांना शोकसंवेदना व्यक्त करताना या अपघाताला “अत्यंत वेदनादायक आणि दुर्दैवी” असे संबोधले.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment