संतापजनक! नवी मुंबईतील डेंटल कॉलेजमध्ये रॅगिंग; ज्युनियरला दारु पाजली आणि पँटमध्ये…

WhatsApp Group

Kamothe Dental College Ragging Case : नवी मुंबईतील कामोठे येथील डेंटल कॉलेजच्या चार सीनियर विद्यार्थ्यांवर ज्युनिअर विद्यार्थ्याला रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलेजनं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, चौघांनी १९ वर्षीय विद्यार्थ्याला दारू पाजली आणि त्याच्या पॅन्टमध्ये लघवी करण्यासाठी जबरदस्ती केली. महाविद्यालयानं त्या चार विद्यार्थ्यांना निलंबित केलं असलं तरी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पीडित विद्यार्थ्यांसह तिघांना रुममध्ये बोलावलं आणि..

पालकांना सांगितलं..

ही कथित घटना जुलैमध्ये घडली होती, परंतु आतापर्यंत पीडित विद्यार्थ्यानं याबबाबत काही सांगितलं नव्हतं. कोल्हापुरातील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्यानं आपल्या पालकांना छळ झाल्याबद्दल सांगितलं. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला हा विद्यार्थी तीन बॅचमेटसह कामोठे येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. २१ ते २२ वयोगटातील आणि त्याच पदवी अभ्यासक्रमाच्या तिसर्‍या वर्षात शिकत असलेले चौघे जण, त्याच परिसरात दुसऱ्या फ्लॅटमध्ये भाडेकरू आहेत. कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार, या चार विद्यार्थ्यांनी पीडीत विद्यार्थी आणि त्याच्या तीन रूममेटला आपल्या घरी येऊन जबरदस्तीनं दारू प्यायला सांगितलं.

हेही वाचा – मोठी बातमी..! टी-२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा; वाचा कोण आहेत ते १५ खेळाडू!

पॅँटमध्ये लघवी करण्यास सांगितलं!

त्यानंतर कोल्हापूरच्या विद्यार्थ्याला वॉशरुमला जायचं होतं. तेव्हा त्या चौघांनी त्याला मज्जाव केला आणि आणखी पाणी पिण्यास भाग पाडलं. इतकंच नाही, तर पीडित विद्यार्थ्याला आधी लघवी रोखून धरण्यास आणि त्यानंतर पॅँटमध्ये लघवी करण्यासही सांगितलं. या पीडित विद्यार्थ्यानं आई-वडिलांनी ही घटना सांगितली आणि प्रकरण उघडकीस आलं. पालकांनी ई-मेलद्वारे कॉलेजकडं तक्रार केली. कामोठे पोलिसांनी त्य़ा चार सीनियर विद्यार्थ्यांविरुद्ध महाराष्ट्र छळ प्रतिबंधक कायदा 1999 (4) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment