

Nepal Protest : नेपाळमध्ये Gen Z तरुणांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या प्रचंड विरोध प्रदर्शनानंतर आता देशात अंतरिम सरकार स्थापन करण्याची हालचाल सुरु झाली आहे. आंदोलनकर्त्यांनी नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधानपदी निवडले आहे. या ऐतिहासिक आंदोलनामध्ये काठमांडूचे मेयर बालेन शाह हे तरुणांची प्रेरणास्थानी बनले असून, त्यांनी सोशल मीडियावरून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
बालेन शाह म्हणाले….
बालेन शाह यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, “प्रिय Gen Z आणि सर्व नेपाळी बांधवांनो, देश एका अशा वळणावर आहे जे इतिहासात कधीच नव्हते. आता आपण आपल्या ‘सुवर्ण युगाकडे’ वाटचाल करत आहात. कृपया घाबरू नका, संयम ठेवा.”
बालेन शाह यांचे मत आहे की अंतरिम सरकारचे उद्दिष्ट देशात नवीन निवडणुका घेऊन नव्या जनतेचा कौल घेणे हेच आहे. त्यांनी सुशीला कार्की यांच्या नावाला पाठिंबा दर्शवताना नेपाळी जनतेच्या परिपक्वतेचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले, “कृपया घाई करू नका. तुमचा जोश, विचार आणि प्रामाणिकपणाची देशाला कायम गरज आहे, तात्पुरती नव्हे. आता निवडणुका होतील आणि देश नव्या दिशेने जाईल.”
Eknath Shinde speaks to stranded Maharashtra tourists in Nepal, assures help for safe return
— ANI Digital (@ani_digital) September 10, 2025
Read @ANI Story | https://t.co/QKVBeexdGK#EknathShinde #Maharashtra #NepalGenZProtest pic.twitter.com/sBUKgAJ9H8
दरम्यान, नेपाळचे माजी गृहमंत्री रवि लामिछाने यांची तुरुंगातून सुटका झाली असून, त्यांनी स्पष्ट केले की ते सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत. त्यांनी फेसबुक व्हिडीओद्वारे सांगितले की, “नागरिकांची सर्वोच्चता अबाधित राहायला हवी.” त्यांनी तुरुंग प्रशासनाच्या सूचनेनुसार बाहेर आल्याचे सांगत, परिस्थिती निवळल्यानंतर पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी दर्शवली.
आंदोलनाचा हिंसक वळण : 30 मृत, 1000 हून अधिक जखमी
या आंदोलनाने पुढे हिंसक वळण घेतले. सरकारने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंसक हल्ले झाले. या संघर्षात 30 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, 1000 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
आंदोलकांनी अनेक नेत्यांच्या घरांवर हल्ले, जेलवर आक्रमण केले. काही ठिकाणी कैदी पळून जाण्याच्या घटना देखील घडल्या.
महाराष्ट्राचे 300 नागरिक नेपाळमध्ये अडकले
या परिस्थितीमुळे अनेक भारतीय पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत, त्यात महाराष्ट्रातील सुमारे 300 पर्यटकांचा समावेश आहे. मुरबाड (ठाणे) येथील काही पर्यटकांचा राज्य सरकारने थेट संपर्क साधला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः या पर्यटकांशी संपर्क साधून त्यांची काळजी घेतली आहे. राज्य सरकार केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असून, लवकरात लवकर या नागरिकांना परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा