

Rahul Deshpande Tger Shroff Worli Programme : वरळी येथील जांबोरी मैदानावर भारतीय जनता पार्टीतर्फे दीपोत्सवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान घडलेली एक घटना महाराष्ट्रभर चर्चेचा आणि वादाचा विषय ठरत आहे. या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेता शास्त्रीय संगीत गायक राहुल देशपांडे याचा अपमान झाल्याची भावना सोशल मीडियावर व्यक्त करण्यात आली आहे. ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ या कार्यक्रमात राहुल आपले गाणे सादर करत असताना बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची एण्ट्री झाली आणि पुढे झालेला प्रसंग वादाचा विषय ठरला.
नक्की काय घडले?
या कार्यक्रमात राहुल देशपांडे गाण्याची सुरुवात करत असताना बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफची एण्ट्री झाली. यानंतर राहुलचे गाणे थांबवण्यात आले. मात्र राहुलने मी २० मिनिटात गाणे संपवतो त्यानंतर तुम्हाला पाहिजे ते करा, असे म्हटले. त्यानंतरही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत मुलुंडचे भाजप आमदार मिहिर कोटेचा यांनी टायगरला मंचावर बोलावून सत्कार केला. मराठी कलाकाराला डावलून बॉलिवूड कलाकारांना दिलेली वागणूक पाहून सर्वांनी राग व्यक्त केला आहे.
हाच का मराठी कलाकारांचा सन्मान….!!!!
भाजप आयोजित मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे
मराठी कलाकारांची चेष्टा……..@abpmajhatv @TV9Marathi @saamTVnews @JaiMaharashtraN @zee24taasnews @ANI @ShivsenaComms pic.twitter.com/f7HxpcFbUV— Sachin Ahir (@AhirsachinAhir) October 20, 2022
हेही वाचा – धक्कादायक..! स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी १६ वर्षाची मुलगी रक्त विकायला निघाली
शिवसेनेचे विधानपरिषदेवरील आमदार सचिन अहिर यांनीही हा व्हिडिओ शेअर करत ‘हाच का मराठी कलाकाराचा सन्मान?’ अशा शब्दात जाब विचारला आहे. यावर भाजपा नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ” स्वत: काही करायचे नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत आणि अपयश लपवण्यासाठी रडायचे हाच धंदा सुरु केला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काही झालं तरी रडत असते. त्यांनी आपले नाव रडकी सेना ठेवावे.”
वरळीतील जांबोरी मैदानात भाजपाचे कार्यक्रम होत आहेत, कारण मुंबईकरांशी आमची नाळ जोडलेली आहे. मुंबईकरांच्या मनात काय आहे, हे आम्हाला कळतं. जे टीका करत आहेत त्यांना मुंबईकारांशी काही घेणे देणे नाही. विशेषतः वरळीच्या आमदारांना पेग, पेग्विन आणि पार्टी याशिवाय काहीच दिसत नाही. pic.twitter.com/lWnwhGXKY2
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) October 20, 2022