कुत्रा चावत होता, मालक हसत होता! मुंबईतील भीषण घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

WhatsApp Group

Pitbull Attacks Boy Mumbai : मुंबईत मानखुर्द परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका पिटबुल जातीच्या हिंसक कुत्र्यानं एका 11 वर्षांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केला. विशेष म्हणजे या हल्ल्यादरम्यान कुत्र्याचा मालक सोहेल हसन (वय 43) फक्त बघत राहिला आणि हसत राहिला!

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं की एक डोळे भरून घाबरलेला मुलगा रिक्षामध्ये बसलेला आहे, त्याच्या अगदी शेजारी पिटबुल आहे. रिक्षाच्या पुढच्या सीटवर मालक बसलेला आहे आणि कुत्र्याचा दोर पकडलेला असूनही त्याला आवर घालत नाही.

मुलाचा हंबरडा

“मला इथून काढा, तो मला चावतोय!” असं रडत रडत तो मुलगा ओरडतो. अचानक तो पिटबुल मुलाच्या चेहऱ्यावर चावा घेतो. तेव्हाच काही लोक ओरडून म्हणताना दिसतात, “चावेल रे!” मात्र मालक अजिबात हलत नाही.

मुलगा ‘अंकल-अंकल’ म्हणत विनवण्या करतो, पण मालक हसतोच राहतो. अखेर मुलगा रिक्षातून उडी मारतो आणि पळ काढतो, पण कुत्रा त्याच्या मागे धावतो. हे सर्व व्हिडिओत कैद झालं आहे आणि लोक त्याच्यावर हसत असल्याचंही ऐकू येतं!

पोलिसांची कारवाई

या घटनेनंतर मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. मानखुर्द पोलिसांनी आरोपी सोहेल हसन याच्यावर BNS च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर कलम 35(3) अंतर्गत नोटीसही बजावण्यात आली आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment