60 सेकंदात 2 लाखांची लूट! रस्त्यावर लहानगा पडला आणि…जळगावात फिल्मी स्टाईल चोरीचा VIDEO!

WhatsApp Group

Jalgaon Robbery : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात एका सेवानिवृत्त शिक्षकाला लुबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या चोरीत एका अल्पवयीन मुलाचा वापर करून ‘मिर्गीचा झटका’ येत असल्याचा नाटक रचण्यात आलं होतं. याचा CCTV व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

काय घडलं नेमकं?

ही घटना जळगावच्या पाचोरा शहरात घडली असून, चोरी एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी करण्यात आली. CCTV फुटेजनुसार, एक लहान मुलगा घरासमोर येतो आणि थेट रस्त्यावर झोपतो. तो मिर्गीचा झटका येत असल्याचा बनाव करतो. हे दृश्य पाहून घरातील शिक्षक घाबरून बाहेर धावून येतात आणि त्या मुलाला सावरायचा प्रयत्न करतात.

या दरम्यान काय होतं?

ज्यावेळी शिक्षक मुलाला मदत करत होते, त्याच वेळी दोन चोरटे बाईकवरून तिथे येतात. आधीपासूनच परिसरात घुटमळत असलेले हे दोघं चोरटे घरात घुसून 2 लाख रुपयांची रोकड लंपास करतात.

हेही वाचा – शाहरुख-दीपिकावर फसवणुकीचा गुन्हा! 23 लाखांची गाडी बिघडली, कोर्टाने दिला FIR चा आदेश

CCTV व्हिडीओने केला उघड

ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर @News18lokmat ह्या X (पूर्वीचं Twitter) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. अनेक नागरिक या फसवणुकीच्या क्लृप्तीवर आश्चर्य व्यक्त करत आहेत.

पोलिसांची कारवाई सुरू

पाचोरा पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केली असून, आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांकडून सांगण्यात येतंय की चोरीच्या घटनेत अल्पवयीन मुलाचा वापर करून लोकांच्या भावना व करुणेचा गैरफायदा घेतला गेला आहे.

‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a comment