

RPF Jawans Saved Life Of Child And Mother : रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी पुन्हा एकदा आपले शौर्य दाखवत सावधपणे एका महिलेचे आणि तिच्या मुलाचे प्राण वाचवले आहेत. ही घटना मुंबईतील मानखुर्द रेल्वे स्थानकाची आहे. येथे ही महिला आपल्या मुलासोबत चालत्या मुंबई लोकल ट्रेनमधून पडली होती. आरपीएफ जवानांना महिला पडताना दिसताच त्यांनी धावतच महिलेला प्लॅटफॉर्मवरून बाजूला काढले. त्यांनी महिलेला ओढण्यात पाच सेकंदही उशीर केला असता तर ती महिला ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडून चाकाखाली आली असती.
रेल्वे संरक्षण दलाच्या गुन्हे शाखेच्या दोन जवानांनी हे धाडसी कृत्य केले आहे. मंगळवारी, मुंबईतील मानखुर्द स्थानकावर, दुपारी बारा वाजता, संबंधित महिला ट्रेनमध्ये चढताच ट्रेन सुरू झाली होती आणि काही वेळातच ट्रेनने वेग पकडला. दरम्यान, धक्का लागल्याने महिला आपल्या बाळासह बाहेर पडली.
हेही वाचा – IND Vs BAN : बांगलादेशनं जिंकला टॉस; ‘अशी’ आहे दोन्ही संघांची Playing 11
#WATCH | Mumbai: Two jawans of the Crime Wing of RPF (Railway Protection Force) saved the lives of a woman and her child who fell off a moving local train due to the jostling of passengers after they boarded it at Mankhurd Railway Station.
(Source: RPF) pic.twitter.com/rHKyxhXYXT
— ANI (@ANI) November 2, 2022
महिला ज्या डब्यातून पडली त्या डब्याच्या समोर एक आरपीएफ जवान उभा होता. समोर उभ्या असलेल्या जवानाने तत्परता दाखवत महिलेजवळ येऊन तिला ओढले. दरम्यान, दुसरा जवानही पळत पळत तेथे पोहोचल्याने अनुचित प्रकार टळला. या पडझडीत महिला आणि तिच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली, मात्र त्यांचे प्राण वाचले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.