

Success Story Of IAS Omkar Pawar In Marathi : वर्षानुवर्षे तयारी करून लोक यूपीएससी परीक्षेत यशस्वी होतात, पण एका छोट्या गावातल्या मुलाने हा पराक्रम दोनदा केला. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या महाराष्ट्राच्या ओमकार पवारने असिस्टंट कमांडंट आणि आयपीएसची नोकरीही सोडली. जाणून घ्या IAS अधिकारी ओमकार पवार याची यशोगाथा.
ओमकार पवार हा महाराष्ट्र केडरचा 2022 बॅचचा IAS अधिकारी. ओमकार (IAS Omkar Pawar) हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावचा रहिवासी आहे. तो एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येतो. त्याची IAS होण्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गावातील सरकारी शाळेत झाले.
त्यानंतर ओमकार (Success Story Of IAS Omkar Pawar) इंजिनीअरिंगसाठी पुण्याला गेला. पुण्याच्या डी.वाय.पाटील कॉलेजमधून त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये इंजिनीअरिंग केले. ओमकारचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न नव्हते, पण त्याचे मार्क्स चांगले असल्याने त्याच्या कुटुंबाने इंजिनीअरिंग करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा – Video : ‘स्वदेस’ चित्रपटाच्या अभिनेत्रीचा भयानक अपघात; जोडप्याचा मृत्यू!
ओमकारने 2015 मध्ये यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली, परंतु पहिल्या 4 प्रयत्नांमध्ये तो अपयशी ठरला. त्याच वर्षी 2018 मध्ये त्यांची सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडर म्हणून निवड झाली. पण त्याला आयएएस होण्याची इच्छा होती, म्हणून त्याने यूपीएससीची तयारी सुरू ठेवली.
2020 मध्ये ओमकारने UPSC पास केली आणि IPS अधिकारी झाला, पण IAS होण्याची इच्छा त्याच्या मनात कायम होती, त्यामुळे यानंतरही त्याने प्रयत्न सुरू ठेवले. जिंकण्याची जिद्द मनाशी बाळगणाऱ्या ओमकार (IAS Omkar Pawar Success Story)ला त्याच्या मेहनतीचे फळ देखील मिळाले आणि 2022 मध्ये तो UPSC पास झाला आणि IAS झाला. मेहनत कधीच व्यर्थ जात नाही, यश एक दिवस नक्कीच मिळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ओमकार पवार.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!