

Mukesh Ambani News In Marathi : उद्योगपती मुकेश अंबानी यांना धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय मुलाला अटक केली आहे. अंबानींला पाठवलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी मुंबई पोलिसांनी आरोपीला तेलंगणातून अटक केली आहे. गणेश रमेश वनपर्धी असे आरोपी मुलाचे नाव आहे.
वनपर्धीने स्वत: शादाब खानच्या नावाने मेल पाठवला होता आणि पहिल्या ईमेलमध्ये 20 कोटी रुपयांची मागणी केली होती, नंतर मागणी वाढवत 400 कोटींवर नेली आणि असे सुमारे पाच ते सहा ईमेल पाठवले, असा आरोप आहे. यापूर्वी, बेल्जियममध्ये ईमेल पाठवण्यासाठी वापरले जाणारे व्हीपीएन नेटवर्क आढळले होते.
27 ऑक्टोबरला पहिली धमकी
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीवर 27 ऑक्टोबरला पहिला धमकीचा मेल आला होता. धमकी देणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते की, जर मला 20 कोटी रुपये मिळाले नाहीत तर जीवे मारून टाकू. यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 ऑक्टोबरला पुन्हा धमकीचा ईमेल आला, मात्र यावेळी ही रक्कम थेट 200 कोटींवर पोहोचली.
हेही वाचा – आनंदाची बातमी! रेशन कार्ड असणाऱ्यांसाठी मोदींची मोठी घोषणा
दुसऱ्या मेलनंतर तीन दिवसांनी म्हणजेच 30 ऑक्टोबरला तिसरा मेल आला, ज्यामध्ये खंडणीची रक्कम थेट 400 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. अशी प्रकरणे सातत्याने उघडकीस आल्यानंतर पोलीसही चिंतेत पडले कारण यापूर्वीही अशा धमक्या उद्योगपतींना देण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते.
पोलिसांसमोर मोठे आव्हान
भारतातील या सर्वात मोठ्या उद्योगपतींकडे कोणीतरी खंडणी मागण्याची किंवा पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही, पण यावेळी त्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याला सातत्याने धमक्या दिल्या. तो ई-मेल पाठवत राहिला आणि प्रत्येक ई-मेलवर खंडणीचे प्रमाणही वाढत गेले, या व्यक्तीला पटकन पकडणे पोलिसांसाठी आव्हान बनले होते.
”आमच्याकडे चांगले शूटर्स आहेत”
शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमेल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने ई-मेल पाठवला होता. ही धमकी थेट अंबानींना ई-मेलमध्ये लिहिली होती. “तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर्स आहेत.” मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारीच्या वतीने आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध मुंबईतील गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
तेलंगणातून आरोपीला अटक
अशाप्रकारे एकापाठोपाठ एक तीन धमकीचे ईमेल आणि प्रत्येक ईमेलमध्ये खंडणीची रक्कम वाढणे ही गंभीर बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी तपासाचा वेग वाढवला आहे. हा मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव शादाब खान आहे आणि दुसरे म्हणजे हे मेल युरोपियन देश बेल्जियममधून पाठवले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. मात्र ही ओळख खरी की खोटी हे अद्याप समजू शकले नाही.