मुंबई पुन्हा रडारवर? ‘या’ तारखेला दहशतवादी हल्ल्याची भीती; कलम 144 लागू

WhatsApp Group

Terrorist Attack Conspiracy In Mumbai : महाराष्ट्रातून आलेल्या मोठ्या बातम्यांनुसार, मुंबईत आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.  इतर काही मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर येत्या 1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनानिमित्त दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबई पोलीस पूर्णपणे अलर्ट मोडवर आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनानिमित्त परेडदरम्यान दहशतवादी आणि समाजकंटक हल्ला करू शकतात.शिवाजी पार्कच्या एअर स्पेसचा वापर दहशतवादी हल्ल्यासाठीही केला जाऊ शकतो. धोका लक्षात घेता सध्या कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच दादर, शिवाजी पार्क, माहीम आणि वरळी या चार पोलीस ठाण्याच्या हद्दी सध्या नो फ्लाईंग झोन घोषित करण्यात आल्या असून, याशिवाय तिथून जाणाऱ्या प्रत्येक संशयित व्यक्तीची तपासणी करण्यात येत आहे.

हेही वाचा – आली महिंद्राची ‘नवीन’ मॅक्स पिकअप..! 25 हजारात करा बुक; किंमत फक्त…

मुंबई पोलिसांचा इशारा

दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेनंतर आता मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इंटेलिजन्स इनपुटनंतर आता पोलीस पूर्वीपेक्षा अधिक सतर्क झाले आहेत. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा पुरेपूर काळजी घेत आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment