Electric Vehicle Toll Waiver : महाराष्ट्र सरकारने पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू या महत्त्वाच्या मार्गांवरून प्रवास करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना टोल शुल्कातून पूर्ण सूट देण्यात आली आहे.
कुठल्या मार्गांवर टोल माफी?
सरकारच्या नव्या निर्णयानुसार खालील मार्गांवर ई-वाहनांना टोल माफ करण्यात आला आहे:
- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे
- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग
- शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू
हा निर्णय लागू झाल्यानंतर ई-वाहन चालकांना प्रवासात आर्थिक बचत होणार असून, पर्यावरणालाही दिलासा मिळणार आहे.
ई-वाहन धोरण 2021 आणि प्रोत्साहन योजनांचा परिणाम
राज्य सरकारने 2021 मध्ये ‘ईलेक्ट्रिक वाहन धोरण’ (EV Policy 2021) जाहीर केलं होतं. त्याअंतर्गत सबसिडी, चार्जिंग स्टेशन, आणि करसवलतीसारखी अनेक प्रोत्साहनं देण्यात आली. केंद्र सरकारच्या FAME योजनेनंही मोठा हातभार लावला होता. मात्र, अलीकडे केंद्रानं सबसिडीत कपात केल्याने EV विक्री मंदावली होती.
या घटीवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं टोल माफीचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – Maratha Reservation : ‘हैदराबाद गॅझेट’ आणि ‘सातारा गॅझेट’ म्हणजे नेमकं काय? आता समजून घ्या एका क्लिकवर!
प्रवास खर्चात बचत + वायूप्रदूषणात घट
टोल माफीमुळे नागरिकांचे हजारो रुपये वाचतील. त्याचबरोबर, ईंधनावरील अवलंबन कमी होऊन वायूप्रदूषणातही लक्षणीय घट होण्याची शक्यता आहे.
सरकारचा उद्देश आहे की नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात ई-वाहनं स्वीकारावीत आणि पारंपरिक पेट्रोल-डिझेल वाहनांपासून हळूहळू सुटका व्हावी.
पुणे – ई-वाहनांची राजधानी?
सध्या महाराष्ट्रात 6 लाखांहून अधिक ई-वाहनांचं नोंदणी झालं असून, पुणे शहरातच 1.25 लाखाहून अधिक ई-व्हेईकल्स आहेत. या वाहनांपैकी बहुतांश ई-कार्स, ई-बसेस, वाणिज्यिक वाहने रोज मुंबईकडे प्रवास करतात.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा