संतापजनक..! ५०० रुपयांमध्ये दोन मुलींना विकलं; ‘अशा’ कामांवर राबत होत्या!

WhatsApp Group

Palghar Jawhar Girls Sold : पालघर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील जव्हारमधील धारणहट्टी येथील दोन अल्पवयीन मुलींना पाचशे रुपयांमध्ये विकल्याचं समोर आलं आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका मेंढपाळानं या दोन अल्पवयीन मुलींची खरेदी केली. विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही गोष्ट समजताच श्रमजीवी संघटनेने पुढाकार घेतला.

या कारवाईनंतर दोनपैकी एका मुलीचा शोध लागला असून दुसऱ्या मुलीचा शोध पोलीस घेत आहेत. मेंढपाळाकडे एक मुलगी तीन वर्षांपासून तर दुसरी मुलगी एका वर्षापासून बालमजुरी करत होती. मेंढ्यांची साफसफाई, घरगुती काम, मेंढ्यांसोबत गुराखी जाण अशा विविध कामांवर या मुली राबवल्या जात होत्या. वर्षाकाठी १२ हजार रुपये आणि एक मेंढी देण्याचे मेंढपाळाने सांगितले होते, पण तो त्यांना वर्षाला ५०० रुपये द्यायचा.

हेही वाचा – VIDEO : पोलीस कर्मचाऱ्याचा तमाशाच्या फडात ‘विनोदी’ नाच; लगेच निलंबन!

मुलींना खरेदी केलेल्या मेंढपाळा विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात कलम ३(१) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. जव्हार मोखाडा विक्रमगड या परिसरातील नागरिकांचा आणि त्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेत हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. अशा मुलांना वेठबिगारी म्हणून राबवला जात असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून करण्यात आला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment