

Women Fight At Toll Plaza : रस्त्याच्या मध्यभागी भांडण करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. तुम्ही मुलींना सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी भांडताना पाहिलं असेल आणि आता महाराष्ट्रातील नाशिकचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये टोल प्लाझावर दोन महिला भांडण करत आहेत. नाशिकच्या पिंपळगाव टोल प्लाझावर ही घटना घडली. या दोन महिला एकमेकांचे केस ओढताना आणि कानाखाली मारतानाही दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये काय?
व्हिडिओमध्ये असं दिसून येतं की या दोन महिलांमध्ये आधी टोल भरण्यावरून बाचाबाची झाली आणि नंतर हा वाद हाणामारीत पोहोचला. महिला प्रवासी आणि महिला टोल बूथ कर्मचारी यांच्यातील बाचाबाची एवढी वाढली की दोघांमध्ये हाणामारी झाली. दोघांनी पूर्ण ताकदीने एकमेकांचे केस ओढले आणि एकमेकांना जोरदार कानाखाली मारल्या. या दरम्यान तेथे उपस्थित असलेले अनेकजण हा तमाशा पाहत असल्याचे दिसून आले. या दोन महिलांमधील हाणामारीमागील कारण अद्याप समोर आलं नसून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा – OMG! नवजात बाळाला बॉक्समध्ये भरून तो नदीत फेकणार होता; मग पुढे….
A shocking incident has come to light that a fierce fight took place between women at the Pimpalgaon toll booth near Nashik. @IGPNashikRange pic.twitter.com/1PwGTugSqo
— 𝕄𝕣.ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) September 15, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील सीआरपीएफ जवान त्यांची पत्नी आणि दोन मुलांसोबत पुण्याला जात होत्या. त्यांनी बुधवारी संध्याकाळी पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर स्वत:चं शासकीय कार्ड दाखवून खासगी वाहन सोडण्याची विनंती केली. त्यावर टोलनाक्यावरील महिला कर्मचाऱ्यांनी हे कार्ड चालणार नाही, तुम्हाला टोल भरवाच लागेल, असं सांगितलं दोघामध्ये झालेली वाद मारामारीपर्यंत गेला.
हेही वाचा – किती भयानक आहे हे..! बोनेट उघडून ‘तो’ गाडी रिपेअर करत होता, इतक्यात…; पाहा VIDEO
पिंपळगाव टोलनाका चर्चेत
ही दिवसांपूर्वी पिंपळगाव टोलनाक्यावर थेट नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचीच गाडी टोल कर्मचाऱ्यांनी थांबवली होती. सचिन पाटील आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वादही झाला होता, तेव्हा या टोलनाका कर्मचार्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.