

Vasai Boy Electric Shock : नायगाव (पूर्व) येथील सुंदरबन सोसायटीमध्ये १६ वर्षांचा यश यादव आपल्या मित्रांसोबत बॅडमिंटन खेळत होता. खेळताना शटलकॉक एका फ्लॅटच्या खिडकीत अडकला. ती काढण्यासाठी गेला असताना त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो जागेवरच कोसळला. काही क्षणात मित्रांनी त्याला हॉस्पिटलला नेले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
सगळा प्रकार सोसायटीच्या CCTV कॅमेऱ्यात कैद
त्यात दिसते की, यश खिडकीकडे जातो आणि अचानक तो विजेच्या झटक्याने खाली पडतो. घटनास्थळी जमा झालेल्या लोकांनी तातडीने मदत केली, पण दुर्दैव टळू शकले नाही.
हेही वाचा – शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या यादीत! पण ‘या’ दोन प्रसिद्ध किल्ल्यांना नाही मिळालं स्थान…
अपघात की निष्काळजीपणा?
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून, या मृत्यूस कोणाची निष्काळजीपणा कारणीभूत आहे का? याचा शोध घेतला जात आहे. विद्युत तांत्रिक दोष किंवा चुकीची वायरिंग यामुळे ही दुर्घटना घडली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पालक व सोसायट्यांना इशारा
या दुर्घटनेने पालक आणि सोसायटी व्यवस्थापनासाठी एक मोठा इशारा दिला आहे, मुलांसाठी खेळाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि विद्युत यंत्रणेची नियमित तपासणी ही अत्यंत आवश्यक आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!