टॅलेंट भारताबाहेर गेलं! अंबाती रायुडू आता ‘या’ विदेशी लीगसाठी खेळणार

WhatsApp Group

Ambati Rayudu : चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा आयपीएल चॅम्पियन बनल्यानंतर अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती जाहीर केली. 37 वर्षीय रायुडू पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. रायुडू आता परदेशी लीगमध्ये आगपाखड करताना दिसणार आहे. चेन्नई सुपर किंग्जचा सहकारी अष्टपैलू ड्वेन ब्राव्होसह तो या लीगमध्ये रंगत वाढवेल.

अंबाती रायुडू अमेरिकेच्या T20 लीग मेजर लीग क्रिकेट (MLC) च्या पहिल्या आवृत्तीत सहभागी होणार आहे. या लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जची फ्रेंचाइजी टेक्सास सुपर किंग्जकडून खेळणार आहे. टेक्सास सुपर किंग्ज संघाने सोशल मीडियावर ही माहिती दिली. या लीगमध्ये खेळणारा अंबाती रायुडू हा पहिला क्रिकेटपटू ठरणार आहे जो यापूर्वी भारतीय क्रिकेट संघासोबत खेळला आहे.

T20 मेजर लीग क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर पहिल्या हंगामात 6 संघ सहभागी होतील. याची सुरुवात 13 जुलैपासून होईल तर अंतिम सामना 31 जुलैला होईल. या लीगमध्ये अंबाती रायुडू त्याच्या चेन्नई सुपर किंग्जचे सहकारी डेव्हॉन कॉनवे, मिचेल सँटनर, ड्वेन ब्राव्हो आणि डेव्हिड मिलर यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे. कॉनवेने सीएसकेसाठी सलामी दिली तर ब्राव्हो चेन्नई संघाचा सध्याचा गोलंदाजी प्रशिक्षक आहे.

हेही वाचा – OLA च्या इलेक्ट्रिक कारची पहिली झलक, पाहा जबरदस्त डिझाईन!

टेक्सास सुपर किंग्जचा पहिला सामना लॉस एंजेलिस नाइट रायडर्सशी होणार आहे. अंबाती रायुडूने टेक्सास सुपरकिंग्जच्या पिवळ्या रंगाच्या जर्सीत स्वतःचा एक फोटो देखील ट्विटरवर शेअर केला आहे. आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर रायुडू राजकारणात नवी इनिंग सुरू करेल, अशी अटकळ बांधली जात होती.

अंबाती रायुडू हा 3 वेळचा चॅम्पियन CSK संघाचा सदस्य आहे. CSK ने 2018, 2021 आणि 2023 मध्ये IPL चे विजेतेपद जिंकले तेव्हा रायुडू या चॅम्पियन संघाचा एक भाग होता. त्याने भारतीय क्रिकेट आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. अंबाती रायुडूने नुकतेच बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या दोघांमुळे माझे क्रिकेट करिअर उद्ध्वस्त झाले आणि मला मानसिक त्रास झाला, असे रायुडूने म्हटले होते.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment