Asia Cup 2022 : गणेशोत्सव आणि मॅच…व्वा! पाकिस्ताननंतर आज भारत ‘या’ संघाशी भिडणार

WhatsApp Group

Asia Cup 2022 : आशिया कप २००२२मध्ये आज (३१ ऑगस्ट) टीम इंडियाचा दुसरा सामना हाँगकाँगशी (IND vs HK) होणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. पहिल्या सामन्यात रोहित ब्रिगेडनं पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. आता कागदावर अत्यंत कमकुवत वाटणाऱ्या हाँगकाँगला हरवून भारतीय संघ सुपर फोरमध्ये आपलं स्थान पक्कं करू इच्छितो.

केएल राहुलसारख्या फलंदाजांसाठी हा सामना लयीत परतण्याची सुवर्णसंधी असेल. असं असलं तरी, रोहित शर्माच्या संघासाठी हा गट-अ सामना कोणत्याही सराव सामन्यापेक्षा कमी असणार नाही. हाँगकाँग संघातील अधिक खेळाडू भारत आणि पाकिस्तान वंशाचे आहेत. केएल राहुलनं रविवारी पाकिस्तानविरुद्ध या वर्षातील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तो आणि रोहित शर्मा सांघिक सरावावर लक्ष केंद्रित करू इच्छितो. राहुल आपला डाव कसा पुढं नेतो हे पाहणं रंजक ठरेल. ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी योग्य संघ शोधण्यावरही भारताचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा – ‘कपल’ लोकांसाठी गणपती मंदिर..! ‘हा’ बाप्पा करतो सगळ्या इच्छा पूर्ण; नक्की वाचा!

विराटला संधी

विराट कोहलीसाठी हा सामना फलंदाजीच्या सरावासाठीही चांगला असेल, ज्यामुळं तो लयीत परत येऊ शकेल. रविवारी पाकिस्तानविरुद्ध त्यानं संयमी खेळी खेळली. विराटनं ३४ चेंडूत ३५ धावा केल्या, पण त्याला मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्यात अपयश आलं. पाकिस्तानविरुद्ध विशेष काही करू न शकलेल्या रोहितकडूनही चांगली खेळी खेळण्याची अपेक्षा असेल. रवींद्र जडेजा चौथ्या क्रमांकावर येणार, की दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संधी मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. हाँगकाँगकडे पाकिस्तानसारखा गोलंदाज नाही. पण त्यांना कमकुवत मानता येणार नाही, कारण अज्ञात संघाच्या कामगिरीचा अंदाज लावता येत नाही. कर्णधार रोहित शर्मानं हे प्रयोग सुरूच राहणार असल्याचे स्पष्टपणं सांगितलं आहे, त्यामुळं फलंदाजीच्या क्रमात किंवा सांघिक संयोजनात बदल झाल्यास आश्चर्य वाटायला नको.

या सामन्याशिवाय हाँगकाँग संघाचा कर्णधार निजाकत खान हा भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा जबरा चाहता आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं मान्यही केले होते. तो म्हणाला, ”मी विराट कोहलीचा चाहता आहे आणि स्टार फलंदाजाने फॉर्ममध्ये परतावे अशी माझी इच्छा आहे.” आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीचा फॉर्म गेल्या काही काळापासून चर्चेचा विषय बनला आहे, कारण विराट २०१९ पासून खेळाच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment