IND vs PAK Asia Cup 2022 : भुवनेश्वर, हार्दिकमुळं पाकिस्तानचा खेळखंडोबा..! भारतासमोर १४८ धावांचं आव्हान

WhatsApp Group

Asia Cup 2022 : आशिया कप २०२२ स्पर्धेचा ‘हाय-व्होल्टेज’ सामना भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात दुबईत खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्याच्या तिखट माऱ्यासमोर पाकिस्तान १४७ धावांवर ऑलआऊट झाला. मोहम्मद रिझवान वगळता पाकिस्तानचे इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. रोहित शर्मानं या सामन्यात ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला विकेटकीपर म्हणून संधी दिली आहे.

पाकिस्तानचा डाव

टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये भारताविरुद्ध स्फोटक सलामी दिलेली बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानची जोडी आज खास कमाल करू शकली नाही. भारताचा प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमला (१०) स्वस्तात झेलबाद केलं. त्यानंतर पॉवरप्लेमध्ये पाकिस्ताननं फखर जमानला (१०) गमावलं. आवेश खाननं त्याला यष्टीपाठी झेलबाद केलं. एका बाजूनं किल्ला लढणारा मोहम्मद रिझवान अर्धशतकापूर्वी बाद झाला. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यानं रिझवानला बाद करत पाकिस्तानला जबर धक्का दिला. रिझवाननं ४ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावा केल्या. यानंतर भुवनेश्वर आणि हार्दिकनं पाकिस्तानला सुरूंग लावला. १९व्या षटकात भुवनेश्वरनं दोन बळी घेतले. १९.५ षटकात पाकिस्तानचा डाव १४७ धावांवर आटोपला. भुवनेश्वरनं २६ धावांत ४ बळी घेतले, हार्दिकला ३ तर अर्शदीपला २ बळी घेता आले.

हेही वाचा – IND Vs PAK Asia Cup 2022 : ‘‘मी स्वतःला सुपरस्टार समजत होतो, पण…”, विजय देवरकोंडाला कळलं सत्य!

दोन्ही संघांची Playing 11

भारत – रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग.

पाकिस्तान – बाबर आझम (कप्तान), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, फखर अहमद, खुशदल शाह, आसिफ अली, शादाब खान, मुहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस रौफ, शाहनाझ दहानी.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment