पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीला भेटले विराट, चहल आणि पंत! VIDEO जिंकतोय लाखोंची मनं…

WhatsApp Group

India Cricketers Meet Shaheen Shah Afridi : यूएईमध्ये १५व्या आशिया चषक स्पर्धेसाठी (Asia Cup 2022) सगळे सज्ज झाले आहेत. उद्यापासून म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यानं त्याची सुरुवात होणार आहे. मात्र २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासामन्य सामन्यावर संपूर्ण जगाच्या क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल उत्सुकता आहे. जणू पुन्हा एकदा दोन्ही देश युद्धभूमीवर आमनेसामने येणार आहेत.

भारत-पाकिस्तानच्या खेळाडूंची भेट

दुबईला पोहोचल्यानंतर भारत-पाकिस्तान संघातील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण वागणूक पाहायला मिळत आहे. दुखापतग्रस्त असतानाही शाहीन आफ्रिदी पाकिस्तानी संघासह आशिया कपसाठी पाकिस्तानात पोहोचला आहे. गुरुवारी सराव सत्रापूर्वी विराट कोहलीसह इतर भारतीय खेळाडूंनी त्याच्या दुखापती आणि फिटनेसबाबत विचारपूस केली. शाहीनला भेटलेल्या खेळाडूंमध्ये युझवेंद्र चहल, ऋषभ पंत, केएल राहुल यांचा समावेश होता.

हेही वाचा – VIDEO : पाकिस्तानी फॅनचं ‘विराटप्रेम’! म्हणाला, “मी माझ्या देशाच्या खेळाडूंसोबत सेल्फी नाही घेतला, पण…”

पाकिस्तान क्रिकेटनं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये फिरकीपटू युजवेंद्र चहलनं शाहीनची भेट घेतली आणि दुखापतीबद्दल विचारपूस केली. जेव्हा चहलनं शाहीनला विचारलं, की दुखापत बरी होण्यास किती वेळ लागेल, तेव्हा त्यानं सांगितलं की त्याला आणखी ५-६ आठवडे लागतील आणि तो वर्ल्डकपर्यंत बरा होईल. यानंतर विराट कोहली शाहीनला भेटायला आला आणि त्याची प्रकृती जाणून घेतली. विराट त्याला शेवटी स्वतःची काळजी घेण्यास सांगतो. दोघंही एकमेकांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं.

हेही वाचा – Asia Cup 2022 : भारत-पाकिस्तान थरारासाठी आख्खा देश सज्ज..! जाणून घ्या मॅचबाबत सर्व काही; फक्त एका क्लिकवर!

शेवटी ऋषभ पंत आणि केएल राहुल शाहीनला भेटले. ऋषभ पंत शाहीनसोबत विनोद करताना दिसला. शाहीननं पंतला सांगितलं, ”मी विचार करत आहे की गोलंदाजी सोडून फलंदाजीला सुरुवात करावी आणि एका हातानं षटकार मारावा.” यावर पंत म्हणाला, ”जर तू वेगवान गोलंदाज आहेस तर तुला अर्ज करावा लागेल.”

हेही वाचा – विराटसारखं मन…मनासारखा विराट! पाकिस्तानच्या बाबर आझमला भेटला आणि…; पाहा VIDEO

मोहम्मद वसीमला पाठदुखीची समस्या

शाहीन आफ्रिदी संघाबाहेर पडल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघासाठी आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. नेट सत्रादरम्यान मोहम्मद वसीमला पाठदुखीची समस्या जाणवली आहे, त्यानंतर त्याला एमआरआयसाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या दुखापतीमुळं वसीम भारताविरुद्ध खेळू शकला नाही, तर पाकिस्तानसाठी हा मोठा धक्का असेल. शाहीन आफ्रिदीनं आपल्या टी-२० कारकिर्दीतील ४० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ७.७६च्या इकॉनॉमीनं ४७ बळी घेतले आहेत, तर २१ वर्षीय मोहम्मद वसीमनं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ११ टी-२० सामने खेळले आहेत. त्यानं १५१७ विकेट्स घेतल्या आहेत.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

 

Leave a comment