

Asia Cup 2023 : टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांनी संघाची घोषणा केल्यानंतर प्रत्येक खेळाडूची ताकद आणि कमकुवतपणाचा उल्लेख केला. दुखापतीतून सावरत केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला 17 सदस्यीय संघात स्थान मिळू शकले नाही. त्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. दरम्यान, रोहितचे एक वक्तव्य चांगलेच व्हायरल होत आहे. आशिया चषक स्पर्धेत एकूण 6 संघ उतरले आहेत. हे सामने 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सप्टेंबरला रोमांचक सामना होणार आहे
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित शर्माला विचारण्यात आले की, प्रत्येक खेळाडूचे स्थान आधीच ठरलेले असते, त्यानंतर खेळाडू त्यानुसार तयार होतो. पण अलीकडे संघाने बरेच बदल केले, विशेषत: क्रमांक-4 वर. यावर कर्णधार रोहित म्हणाला की, ओपनरच्या जागी ओपनर खेळणार. तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू तिसऱ्या क्रमांकावर खेळणार. केएल राहुल पाचव्या क्रमांकावर येत होता, तो त्या क्रमांकावर खेळेल. हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर आणि रवींद्र जडेजा क्रमांक सातव्या क्रमांकावर खेळणार.
हेही वाचा – Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा! ‘या’ खेळाडूची सरप्राईज एन्ट्री!
रोहित शर्मा म्हणाला की, नंबर-4 आणि नंबर-5 खेळाडू वर-खाली झाले, तरीही काही फरक पडत नाही. संघात इतकी लवचिकता असणे आवश्यक आहे. जेव्हा आम्ही संघात आलो तेव्हा आम्ही तरुणांनीही सर्व क्रमांकावर फलंदाजी केली. ओपनर खेळाडूला आठव्या क्रमांकावर पाठवत नाही किंवा आठव्या क्रमांकाच्या खेळाडूला ओपनिंगला पाठवत नाही. आम्ही हे वेडे काम करत नाही.
टीम इंडियामध्ये चौथ्या क्रमांकावर कोणाला संधी द्यायची, हा चर्चेचा विषय आहे. 2019 च्या विश्वचषकात अखेरच्या क्षणी अंबाती रायुडूच्या जागी विजय शंकरची संघात निवड करण्यात आली. विश्वचषकात विजय काही विशेष करू शकला नाही आणि त्याचा फटका टीम इंडियाला सहन करावा लागला. गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पराभूत होऊन संघ बाहेर पडला होता. श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून चौथ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत आहे, मात्र तो आता दुखापतीतून पुनरागमन करत आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादवला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते, मात्र तो फारच अपयशी ठरला होता.
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!