Commonwealth Games 2022 : टीम इंडियाच्या जर्सीवर अशोकचक्र का नाही? ‘हे’ आहे कारण!

WhatsApp Group

मुंबई : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. सामन्यादरम्यान भारतीय खेळाडूंनी परिधान केलेल्या जर्सीमध्ये तिरंग्याच्या मध्यभागी असलेलं अशोक चक्र गायब होतं. गृह मंत्रालयानं क्रिकेटपटूंना त्यांच्या जर्सी किंवा हेल्मेटवर राष्ट्रध्वज (अशोक चक्रासह) लावण्यास मनाई केली आहे. २०२२च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय महिला संघाची सुरुवात निराशाजनक झाली. एजबॅस्टन इथं शुक्रवारी झालेल्या सामन्यात हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील संघाला ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या सामन्यादरम्यान सर्वांच्या नजरा भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर खिळल्या होत्या, ज्यामध्ये तिरंग्याच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र खेळाडूंच्या जर्सीतून गायब होतं.

भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर तिरंगा ‘इंडिया’ अर्थात I या पहिल्या अक्षरावर जोडलेला होता, पण फरक एवढाच होता की तो अशोक चक्राशिवाय होता. अशोक चक्राशिवाय तिरंगा ध्वज वापरणाऱ्या खेळाडूंना हेल्मेट किंवा वेशभूषा करण्यास हरकत नाही, असं भारत सरकारनं यापूर्वीच स्पष्ट केलं होते.

२००५ मध्ये, गृह मंत्रालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना संपूर्ण नियमाची माहिती दिली होती. शुक्ला यांनी २००५ मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितलं की, ”गृहमंत्र्यांनी मला सांगितलं आहे की, क्रिकेटर अशोक चक्राशिवाय हेल्मेट किंवा पोशाखावर तिरंगा वापरू शकतात.”

हेही वाचा – ‘त्या’ वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण; म्हणाले, “महाराष्ट्राला पुढं नेण्यात…”

का आहे मनाई?

खेळाडूंनी हेल्मेट किंवा जर्सीवर तिरंगा वापरण्यास हरकत नाही. कायद्यानुसार राष्ट्रध्वज (अशोक चक्रासह संपूर्ण तिरंगा) प्रदर्शित करता येत नाही. गृह मंत्रालयानं क्रिकेटपटूंना त्यांच्या जर्सी किंवा हेल्मेटवर राष्ट्रध्वज घालण्यास मनाई केली आहे, कारण ते राष्ट्रीय सन्मान कायदा १९७१चे उल्लंघन करेल, ज्यामुळे भारतीय संविधानाचा अवमान होईल.

असा रंगला सामना…

नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतीय संघानं आठ विकेट्सवर १५४ धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं ३४ चेंडूत ८ चौकार आणि एका षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शफाली वर्मानंही ४८ धावांची खेळी खेळली, ज्यात ९ चौकारांचा समावेश होता. ऑस्ट्रेलियासाठी फिरकीपटू जेस जोनासेनने सर्वाधिक चार खेळाडूंना बाद केलं. तर मेगन शुटनं दोन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघानं एक षटक शिल्लक असताना तीन गडी राखून सामना जिंकला. ऑस्ट्रेलियन संघाच्या विजयात ऍशले गार्डनरनं महत्त्वाची भूमिका बजावली. गार्डनरनं ३५ चेंडूत नाबाद ५२ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. तर ग्रेस हॅरिसनं ३७ आणि एलाना किंगनं १८ धावांचे योगदान दिले. भारताकडून रेणुका सिंगनं चार आणि दीप्ती शर्मानं दोन खेळाडूंना बाद केले. एकवेळ ऑस्ट्रेलियन संघानं ४९ धावांत ५ विकेट गमावल्या होत्या, पण भारतीय संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही.

‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!

Leave a comment